बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बुलढाणा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे देऊळगाव राजा येथे जल्लोषात स्वागत

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा :बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर, देऊळगाव राजा शहरात कार्यकर्त्यांच्या वतीने ऐतिहासिक आणि अभूतपूर्व जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतिशबाजी, गुलालाची उधळण आणि ‘डॉ. राजेंद्र शिंगणे आगे बढो’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे देऊळगाव राजा शहरात आगमन झाले. सर्वप्रथम त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर, देऊळगाव राजाचे आराध्य दैवत श्री बालाजी महाराज यांचे दर्शन घेऊन त्यांनी आशीर्वाद घेतले.

दर्शनानंतर ते बसस्थानक चौकात आयोजित करण्यात आलेल्या भव्य स्वागत सोहळ्यात सहभागी झाले.यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. शिंगणे यांचे पुष्पहार घालून आणि शाल-श्रीफळ देऊन जंगी स्वागत केले. सहकार क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ आणि दांडग्या अनुभवाचा फायदा बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नक्कीच होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. डॉ. शिंगणे यांच्या नेतृत्वात बँक शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताला प्राधान्य देत अधिक सक्षमपणे वाटचाल करेल, अशी अपेक्षाही यावेळी बोलताना व्यक्त करण्यात आली.

या ऐतिहासिक जल्लोष सोहळ्याला गणेश सवडे, राजू शिरसाट, अर्पिता मिनासे, रामेश्वर रामाणे, विष्णू रामाणे, स्वप्नील रामाणे, राजेश इंगळे, शिवाजी मेहेत्रे, परमेश्वर शिंदे, अनिल शेळके, आकाश कासारे, अतिश कासारे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button