
जीडी रोकडे जिल्हा बुलढाणा प्रतिनिधी… जनुना येथे तालुका खामगाव येथे दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 10 असता येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच सौ सुवर्णाताई गोरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तसेच पंचशील क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते सुनील हेलोडे , सिद्धू शेजव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपल्या भाषणातून सखोल माहिती दिली. कार्यक्रमाला उपस्थित गावातील उपसरपंच . श्री डवंगे ,माजी सरपंच देवानंद शेगाव,अमोल भाऊ गोरे शोभाताई सोडोकार ,ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका गावातील प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाला उपस्थित बाल कलाकार यांनी भीम गीते गायना करिता कार्यक्रमात सहभाग घेतला होता. आभार प्रदर्शन विनोद शेजव यांनी केले……..



