“कुष्ठरोग विभाग अंतर्गत विश्वभारती विद्यालय कारंजा येथे मार्गदर्शन व निबंध स्पर्धा संपन्न

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
“कारंजा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय अंतर्गत कुष्ठरोग विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमा”
कारंजा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कारंजा अंतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना कुष्ठरोग विषयक शास्त्रीय महिती दिली जात असून. तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील शाळेमध्ये निबंध स्पर्धेचे देखील आयोजन केले जात आहे.कुष्ठरोग विषयी जनजागृती करण्याच्या अनुषंगाने आज कारंजा शहरातील विश्वभारती विद्यालय येथे मार्गदर्शन व निबंध स्पर्धा कार्यशाळेच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित जिल्हा कुष्ठरोग पर्यवेक्षक श्री.एम.डी खडतडे, कुष्ठरोग तंत्रज्ञ – श्री.एस.डी जाधव, (पी.पी.एस.एय)क्षयरोग विभाग क्षेत्रकार्य अधिकारी प्रदिप पट्टेबहादुर,
विद्यालयाचे मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती. यावेळी
श्री.एम.डी खडतडे – यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की.
कुष्ठरोग (Leprosy) हा एक कमी प्रमाणात सांसर्गिक आजार आहे, जो मुख्यत: त्वचेला, मज्जा (नर्वस सिस्टम) प्रभावित करतो.हा रोग मायको बॅक्टेरियम लेप्रि नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो.
कुष्ठरोगामुळे त्वचेमध्ये पांढरे ठिपके किंवा डाग, संवेदनाशून्यता (जसे ताप, जखम किंवा कापलेल्या भागावर कमी संवेदना जाणवणे), हात-पायांमध्ये कमजोरी व बधिरता, आणि डोळ्यांमध्ये जळजळ किंवा धूसर दृष्टी होऊ शकते डोळ्याची उघडझाप न होणे.
श्री.एस.डी जाधव – यांनी सांगितलेली – हा रोग दीर्घकाळाच्या संपर्कातून पसरतो, परंतु योग्य पुर्ण बहुविध औषध MDT उपचार घेतल्यास कुष्ठरोग शंभर टक्के बरा होतो. कुष्ठरोगाचे लक्षणे दिसल्यास, वेळेत उपचार घेणं महत्त्वाचं आहे, कारण ते गंभीर स्थितीत जाऊ शकतात.
यावेळी या कार्यक्रमाला विश्वभारती विद्यालयाच्या सर्व शिक्षक वृंद शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सदर कार्यक्रम हा जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ.कावरखे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.ठोंबरे, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
काय आहेत कुष्ठरोगाचे लक्षणे –
- त्वचेवर येणारा कुठलाही चट्टा किंवा डाग कुष्ठरोगाचा असू शकतो.
- त्वचेच्या रंग रूपात होणारे बदल – त्वचा तेलकट, लालसर, सुजलेली, कानाच्या पाळ्या जाड होणे , अंगावरती गाठी,
- चेतातंतू बाधित झाल्याने होणारे संभाव्य परिणाम जसे हातापायाला मुंग्या येणे बधिरता येणे . पायातून चालताना चप्पल गळून पडणे, हातातून वस्तू गळून पडणे किंवा नीट न धरता येणे.
- नसा बाधित झाल्याने हातापायाचे बोटे वाकडे होणे.
डोळ्याची उघडछाप बंद होणे .
असे लक्षणे आढळल्यास आपण जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन कुष्ठरोगाची तपासणी करून घ्यावी.असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.आर नांदे यानी आवाहन केले.



