अण्णासाहेब पाटील यांचे कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी – पालकमंत्री ना. फुंडकरस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:-सागर रावणचोरे
शेगाव:- थोर माथाडी कामगार नेते, अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक आणि मराठा आरक्षणाचे योद्धे स्व. अण्णासाहेब पाटील यांनी केलेले कार्य प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी आज येथे केले.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनात उद्घाटक म्हणून बोलत होते. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या अध्यक्षतेत पार
पडलेल्या या राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनात आमदार रणधीर सावरकर, माजी आमदार वसंतराव खोटरे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. जयराज कोरपे,
शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष . गजानन पुंडकर, कृष्णाभाऊ अंधारे यांच्यासह अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी व समाजबांधव
उपस्थित होते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे मराठा बांधव व इतर आर्थिक दुर्बल घटकांतील तरुणांना स्वयंरोजगारासाठी व्याज परतावा व आर्थिक सहाय्य दिले जाते. यामुळे अनेकांना रोजगारक्षम करण्याचे कार्य होत आहे, असे पालकमंत्री अॅड. फुंडकर यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठी उपस्थिती होती.



