रेल्वे महिला प्रवासी संघटनेने रेल्वे स्टेशनवर राबविले स्वच्छता अभियान

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
शेगाव रेल्वे स्टेशन येथे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने बौद्ध पौर्णिमेनिमित्त ५ मे रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा माधुरी शर्मा, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अकोला जिल्हा अध्यक्ष लीनाताई पाचबोले, फुलाबाई राठोड, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष प्रणिता ताई धामंदे, सरचिटणीस स्नेहलता दाभाडे, शेगाव तालुका अध्यक्षा सौ.शुद्धमती निखाडे, कुंभार समाज महिला आघाडी राज्य सरचिटणीस ज्योतीताई बावस्कर, कुंभार समाज महिला आघाडी जिल्हाध्यक्ष किरणताई लंगोटे, खामगाव तालुकाध्यक्ष मंगलाताई हिवरकर, वैशाली जोशी, कुमारी अनुजा निखाडे यांनी शेगाव रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरील वेटिंग रूमची साफसफाई केली. याच प्रमाणे प्लॅटफॉर्मवर सुद्धा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी शेगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक मोहन देशपांडे, शेगाव रेल्वे स्टेशनचे मेडिकल ऑफिसर इन्चार्ज डॉक्टर अनिल 106



