मित्राच्या लग्नावरून परतणाऱ्या डॉक्टरच्या कारला भीषण अपघात…..

मित्राच्या लग्नावरून परतणाऱ्या डॉक्टरच्या कारला भीषण अपघात…..
डॉ.आकाश खेडकर यांचा मृत्यू ..तर डॉ. दारमोडे गंभीर..-
तालुका प्रतिनिधी
जीडी रोकडे खामगाव
-मित्राच्या लग्नावरून घरी परत येणाऱ्या डॉक्टरांची भरधाव कार अनियंत्रित होऊन फुलावरून पलटी होऊन खाली कोसळली .या भीषण अपघातात डॉ. आकाश सुरेश खेडकर रा. गोंधनापूर यांचा मृत्यू झाला तर डॉ.श्रीकांत दारमोडे हे गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना बुलढाणा रोडवरील सरपंच धाब्या नजीक घडली . तालुक्यातील गोंधनापुर येथील मूळ रहिवासी डॉ.आकाश सुरेश खेडकर वय वर्ष 29 व त्याचे मित्र डॉ. श्रीकांत दामोडे हे दोघे कारणे बुलढाणा येथे एका मित्राच्या ल लग्नाला गेले होते. लग्न समारंभ आठवण दोघे सायंकाळी कारणे घरी परत येत होते दरम्यान मांडणी जवळ सरपंच धाब्या जवळ वळणावर भरधाव वेगातील कार अनियंत्रित होऊन पुलावरून खाली कोसळली. या भीषण अपघातात हे दोघे गंभीरित्या जखमी झाले होते काही वेळाने रोडने जाणाऱ्या काही नागरिकांना ही घटना दिसून आली यावेळी नागरिकांनी धावपळ करत त्या दोघांना अपघाताग्रस्त कारच्या बाहेर काढून खामगाव येथील सिल्वर सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.व डॉ.आकाश खेडकर यांना मृत घोषितकेलं



