
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर शेगांव
आज दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ जिल्हा नंदुरबार तर्फे मा. निवासी उप जिल्हाधिकारी सुधीर खांदे साहेब यांच्या वतीने मा. मुख्यमंत्री साहेब, उप मुख्यमंत्री , तसेच पोलीस महासंचालक यांना निवेदन देऊन सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खुनाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या बाबतचे निवेदन देण्यात आले.यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्राचे राज्य कार्यकारिणी सदस्य मुजम्मील हुसैन, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख जितेंद्र भोई नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष सईद कुरेशी, नवापूर प्रचार संयोजक संदीप कोकणी, जाकिर शेख, छबिलाल गांगुर्डे योगेश वळवी, आदी उपस्थित होते.



