अंतुर्ली येथे वार्षिक स्नेहसंमेलन कलाविष्कार सांस्कृतिक कार्यक्रम व गुणदर्शन सोहळा संपन्न……

मुक्ताईनगर
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील मिठाराम फकिरा तराळ विद्यालय,मंगू रामजी महाजन जुनिअर कॉलेज व दादासो रामभाऊ तराळ इंगलीश मेडीयम स्कूल अंतुर्ली आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कलाविष्कार सांस्कृतिक कार्यक्रम व गुणदर्शन सोहळा संपन्न झाला. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मंगू रामजी महाजन जुनिअर कॉलेजच्या प्रांगणात करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात विदयेची देवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुजन करून व पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली. सरस्वती मातेचे पुजन झाल्या नंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या वेळी चिमुकल्यांनी आपले गुण दाखवत नृत्य केले व वेगवेगळ्या देशभक्ति गाणे व इतर गाण्यावर नृत्य केले काहींनी प्रार्थना म्हटल्या व वेगवेगळ्या गाण्यावर नृत्य केले.यावेळी दिनेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख निलोफर मॅडम यांनी केले, या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजया मानकरे मॅडम व जोसना मेढे मॅडम यांनी केले तर आभार रुपाली पाटील मॅडम यांनी मानले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष ,सदस्य ,शिक्षक वृंद, विदयार्थी विदयार्थ्यीनी व पालक उपस्थित होते.



