खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

सीपीआर जीवन-मृत्यूमधील सुरक्षित भिंत – डॉ. उल्हास पाटील

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

जळगाव – अचानक अस्वस्थ झालेल्या रूग्णाला किंवा व्यक्ती जेव्हा मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचते अशा वेळी सीपीआर ही पध्दत मोठी भूमिका बजावते. सीपीआर म्हणजे कार्डीओ पल्मनरी रिससिटेशन हे तंत्र जीवन आणि मृत्यूमधील सुरक्षित भिंत असल्याचे प्रतिपादन माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी केले.
दरम्यान प्रत्येक व्यक्तीने या तंत्राची माहिती घेतल्यास वेळप्रसंगी अनेक जीव वाचविणे सहज शक्य होतील असेही ते म्हणाले. भारतीय परिचर्या परिषद यांच्याकडून प्राप्त झालेल्या नोटिफिकेशन अनुसार गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील नुकताच फंडामेंटल ऑफ नर्सिंग विभागातर्फे आयोजित यशस्वी एनबीइएमएस सीपीआर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते ोलत होते. यावेळी मुख्याध्यापिका डॉ. विशाखा वाघ उपस्थीत होत्या . मान्यवरांचे हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमात सीपीआर तंत्राचे प्रात्याक्षिक डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे फिजिशियन डॉ. कुटुंबे यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आणि कर्मचार्यांना करून दाखविले. यावेळी डॉ. उल्हास पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, अनेकदा हृदयविकाराचा झटका आल्यावर व्यक्ती अस्वस्थ होतो. अशा वेळी प्रसंगावधान राखून सीपीआर तंत्राचा अवलं केल्यास त्या व्यक्तीचा जीव सहजपणे वाचविता येतो. त्यासाठी प्रत्येकाने ह्या सीपीआर तंत्राची माहिती जाणून घ्यावी असे आवाहन डॉ. उल्हास पाटील यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.पूनम तोडकर यांनी मानले.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button