बुलढाणामहाराष्ट्र
चिखली शहरात आज दुपारी भीषण अग्नि तांडव , जयस्तंभ चौक परिसरातील 7 ते 8 दुकाने जळून खाक .

:- स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
:- प्रतिनिधी प्रशांत चव्हाण
चिखली :- शहरातील जयस्तंभ चौकातील 7 ते 8 दुकाने जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी घडली, हांडगे मामा कचोरी सेंटर यासह आजूबाजूच्या परिसरातील सर्वच दुकाने आगीच्या भक्षस्तानी पडली आहेत. फळांचे दुकाने, चप्पल बुटाची दुकाने, मोबाईल रिपेरिंग चे दुकाने, व नाश्ता सेंटरचे दुकाने ,
यासह जवळपास सर्वच दुकानांची राख रांगोळी झाली आहे.
अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत दुकानांची राखरांगोळी झालेली होती. सध्या जेसीबीच्या साह्याने दुकाने हटवण्यात येत आहेत, या आगीमध्ये कोट्यावधी रुपयांची नुकसान झाल्याचा अंदाज आहे.



