बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर चिखलीत यशस्वी..

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस
चिखली (प्रतिनिधी )

आ. श्वेता महाले पाटील यांच्या पुढाकाराने नागरिकांना एकाच छताखाली मिळाल्या शासकीय सेवा..

‘सर्व महसुली सेवा एकाच ठिकाणी, एकाच दिवशी’ या संकल्पनेवर आधारित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ टप्पा क्र. ०१ चे आयोजन आज चिखली तहसील येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग व नगर विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने उत्साहपूर्वक पार पडले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त व मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला.

मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस व महसूलमंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा जनहितकारी उपक्रम चिखली विधानसभा मतदारसंघात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. चिखली विधानसभेच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व पुढाकारामुळे हे शिबिर मतदारसंघात साकार झाले. आमदार श्वेता महाले पाटील यांनी आपल्या प्रतिनिधींमार्फत सहभाग नोंदवत शिबिराच्या यशस्वी आयोजनात योगदान दिले.

शिबिरात महसूल विभागाचे विविध दाखले व प्रमाणपत्रे, घरकुल योजना, महिला बचत गट लाभ, पीएम किसान नोंदणी, विवाह नोंदणी, दिव्यांग व माजी सैनिकांसाठीच्या सुविधा अशा अनेक शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना तत्काळ व एकाच ठिकाणी देण्यात आला. प्रशासन थेट जनतेच्या दारी पोहोचवणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने लोकाभिमुख ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

शिबिराचे उद्घाटन श्री. अंकुशराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मा. श्री. पंडितदादा देशमुख होते. तहसीलदार श्री. विजय सवडे, मुख्याधिकारी श्री. प्रशांत बिडगर, तालुका कृषी अधिकारी श्री. अशोक सुरडकर, उपनगराध्यक्ष सौ. वैशालीताई कपिल खेडेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. सुषमाताई चव्हाण, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री. विजय वाळेकर, नगरसेवक गोपाल देव्हडे, दीपक खरात, डॉ. महमद इसरार, श्रीमती ज्योतीताई वाळेकर, बाळू जाधव, राम बनसोडे, सुरेंद्र ठाकूर, कैलास खराडे, नायब तहसीलदार मुरली गायकवाड, अर्जुन इंगळे, मंडळ अधिकारी पवार, तलाठी अनिरुद्ध खेडेकर, पुरवठा अधिकारी श्रीमती सोनकाबळे, विस्तारक सिद्धेश्वर ठेंग, संतोष देशमुख, प्रशांत भटकर, शेख आसिफ भाई यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button