बुलढाणामहाराष्ट्र

कवळ्याचे सरपंच ठेकेदाराला पैसे मागतात! १५ नाही २० हजार द्या म्हणतात; सरपंच ५ हजारात काय करून देतात;

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

चिखली तालुक्यातील कव्हाळा येथील सरपंचाची कथित कॉल रेकॉर्डिंग ची क्लिप वायरल झाली आहे. गावात काम करून द्यायच्या बदल्यात सरपंच रवींद्र डाळिंब कर ठेकेदाराला पैशाची मागणी करीत असल्याचे ऑडिओ क्लिप मध्ये ऐकायला मिळते. ठेकेदार १५ हजार द्यायला तयार असताना सरपंच १५ नाही २० हजार द्या असं म्हणतात, त्यावर “बाकीचे सरपंच ५ हजार रुपयात सह्या घेतात, तुम्ही एकटे भेटले एवढे पैसे मागणारे”असं ठेकेदार म्हणतात. त्यावर पुन्हा “मग तुम्ही बाकीच्या सरपंचाकडून काम करून घ्या”
कवळ्यात काम करू नका असा दम सरपंचांनी फोनवरून ठेकेदाराला भरल्याचे ऑडिओ क्लिप वरून समोर आले आहे. संबंधित सरपंच बी आर एस या पक्षाची संबंधित असून ठेकेदाराचे नाव”मदन पाटील “असल्याचे ऑडिओ क्लिप मधील संभाषणावरून कळते.
हे काम आमदारांनी मला दिले आहे, काम आमदार निधीतून आहे असे असे ठेकेदाराने सरपंचांना सांगितले असता “आमदाराशी माझे काही गुंतत नाही “असं सरपंच म्हणतात.१५ नाही २० हजार द्या, तुमच्यासाठी ही गोष्ट चिल्लर आहे. आम्हालाही लोक सांभाळावे लागतात असं या सरपंचांना ठेकेदाराला म्हटलं. त्यावर “तुम्ही फक्त गावा पुरते मर्यादित, आम्हाला जिल्हा सांभाळावा लागतो “असे ठेकेदार सरपंचाला म्हणतात तेव्हा ही बाब सरपंचाच्या चांगली जिव्हारी लागल्याचे ऑडिओ क्लिप मधील संभाषणातून कळते. या ऑडियो क्लिप वरून गावच्या विकासापेक्षा सरपंचांना स्वतःच्या विकासात जास्त रस आल्याचे दिसते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button