खानदेशजळगावा जिल्हा

पिंप्राळा रस्ता मोहिम यशस्वी!

पिंप्राळा रस्ता मोहिम यशस्वी!

जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक ९ पिंप्राळा गांव.येथे ले आऊट मंजुरी पासून ९मीटरचा रस्ता आहे.त्यानुसारच घरबांधकाम परवानगी नगरपालिकेने दिली.आणि आता तीस वर्षांनंतर अवदसा आठवली.म्हणे बांधलेली घरे तोडा आणि रस्ता चौडा करा.आता तीस वर्षांनंतर शुद्धीवर आले असावेत. येथे कोणताही हायवे नाही.रींगरोड नाही.बायपास रोड नाही.तरीही रस्ता चौडा करायचा आहे.गरज काय?जर कोणी गावाची ,नागरिकांची मागणी नसेल तर? या रस्त्याच्या डांबरीकरण ची वर्क ऑर्डर सुद्धा ९मीटर ची दिली आहे. सहा महिने झाले.अजून कामाला सुरुवात नाही. आज येथील नागरिकांना नोटीस देऊन सुनावणी साठी महानगरपालिकेत बोलवले होते.त्यासाठी नागरिकांनी आपला लेखी खुलासा सादर केला. सकाळी ११वाजता महापौर महोदया, जयश्री महाजन यांना प्रवेशद्वार जवळ थांबवून भेट घेतली.विषय सर्विस्तर समजावून सांगितला . त्यांनी नागरिकांची बाजू मान्य केली.महासभेत येऊन बोलण्याची संधी दिली.म्हणून चार लोक आत जाऊन सभेत आपला खुलासा केला.तेथे भाजप नगरसेवकांंनी विरोध केला.भाजपची ही दिशा जनहितविरोधी आहे.हुकुमशाही प्रवृत्तीची आहे.जर सत्ता सोपवली तर गैरफायदा घेणारी आहे.आम्ही पिंप्राळा येथील नागरिक निषेध करीत आहोत.आता भाजप चा एकही नगरसेवक निवडून येऊ नये म्हणून आतापासूनच जनजागृती करीत आहोत. तरीही जर कोणाला मा.नरेद्र मोदी विषयी आदर असेल तर त्यांनी याबाबत तक्रार करावी.कि, जळगाव शहरातील भाजप नगरसेवक नागरिकांच्या हिता विरोधात काम करीत आहेत.तर आम्ही का मतदान करावे? उपमहापौर श्री कुलभूषण पाटील,विरोधी पक्षनेता श्री सुनिल महाजन यांनी विषय समजून घेतला.दोघांनी सहकार्य केले. आता आमची मोहीम योग्य दिशेने जात आहे.आधी रस्ता डांबरीकरण करून घेणे.नंतर विस्तारीकरण रद्द करणे.नंतर नगरसेवक बदलणे….. शिवराम पाटील

महाराष्ट्र जागृत जनमंचजळगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button