जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भवैद्यकीय

उकळी बु. येथील उपसरपंच प्रफुल मानकर यांनी वर्षभराचे मानधन शाळेला दिले भेट ! प्रफुल मानकर यांच्या दानशूरतेचे सर्वत्र कौतुक!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
विजय घोडे जिल्हा प्रतिनिधी

उकळी.

दि.१९ एप्रिल २०२५|
तेल्हारा येथून जवळच असलेले उकळी बु। येथील उपसरपंच प्रफुल मानकर यांनी जि. प. उच्च प्राथमिक शाळा उकळी बु। या शाळेला आपले वर्षभराचे मानधन भेट दिले. हे योगदान खूप मोलाचे असून प्रफुल मानकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


सविस्तर वृत्त असे की, तंत्रज्ञानाच्या युगात शाळेला अनेक ऑनलाईन कामे करावी लागतात. अनेक अहवालांच्या फोटोकॉपी व प्रिंट आऊट काढाव्या लागतात. त्यासाठी शाळेला प्रिंटर मशीन आवश्यक होती. ही बाब मुख्याध्यापकांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या कानी घातल्यावर उपसरपंच प्रफुल मानकर यांनी पुढाकार घेऊन आपले वर्षभराचे मानधन शाळेला भेट दिले. त्यांनी दिलेल्या निधीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षकांनी थोडी भर घालून तेरा हजार आठशे रुपयांचे कॅनॉन कंपनीचे कलर प्रिंटर शाळेसाठी आणले. दानशूरतेचा हा उत्तम नमुना म्हणून उपसरपंच उकळी बु. यांचे सगळीकडे कौतुक होत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विनोद गव्हाळे (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष) हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्याध्यापक के. एम. डाबेराव हे होते. भिमराव परघरमोल सर यांनी उपस्थितांना व विद्यार्थ्यांना दानाचे महत्त्व समजून सांगताना म्हटले की, माणसाने आयुष्यात दानी असावं. दानामुळे आसक्ती कमी होते आणि आसक्तीमुळे दुःख कमी होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक गजेंद्र सुलतान सर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शंकर बगाडे सर कोकीला बोपटे, हिरुताई अंभोरे इत्यादी शिक्षकांनी प्रयत्न केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button