बुलढाणामहाराष्ट्र

मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत गो.से. महाविद्यालयामध्ये रासेयो अंतर्गत विद्यार्थ्यांनी घेतली शपथ*

*’मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत गो.से. महाविद्यालयामध्ये रासेयो अंतर्गत विद्यार्थ्यांनी घेतली शपथ*

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठेखामगाव: स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गोसे महाविद्यालय, खामगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक तथा स्वयंसेविकांना आज बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी “ मेरी माटी मेरा देश” अंतर्गत पंचप्राण शपथ देण्यात आली. तसेच ऑगस्ट क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. मेरी माटी मेरा देश अंतर्गत येणाऱ्या कालावधीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक तथा स्वयंसेविकांमध्ये राष्ट्र चेतना जागवण्यात येईल असे प्रतिपादन महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रफुल उबाळे यांनी यावेळी केले. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीचे संस्कार रुजवले जातात व ते दिवसेंदिवस वृद्धिंगत केले जातील असे प्रतिपादन यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ दीपक नागरिक यांनी केले. क्रांतीदिन हा फक्त एक कार्यक्रम नसून आपल्या देशाविषयी स्वाभिमान जागृत करण्याचा दिवस आहे असे यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा सचिन शिंगणे यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे संचालन गणित विभागाचे प्रा. गौरव गव्हाळे व प्रा. पराग घाईट यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. दत्तात्रय काळे यांनी केले. या उपक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व रासेयो स्वयंसेवक तथा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button