अमळनेरजळगावा जिल्हा

“तीन अपत्यं असूनही मुख्याध्यापक पदोन्नती! ‘लहान कुटुंब’ नियमांना तिलांजली; संगनमताचा आरोप”

अमळनेर प्रतिनिधी

 2003, 2007, 2008 अपत्यांची नोंद; प्रतिज्ञापत्राचा ठावठिकाणा नाही का ? — तक्रारदार रमेश पाटील यांचा आरोप.

मुडी येथील झेड. डी. सोनवणे हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक जिजाबराव विठ्ठल बागुल पदोन्नती प्रकरणात गंभीर अनियमितता उघडकीस येत असून, शिक्षण विभागाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्याध्यापक जिजाबराव विठ्ठल बागुल यांना शासन नियमांना डावलून पदोन्नती देण्यात आल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदार रमेश विनायकराव पाटील यांनी केलेल्या तक्रारीनुसार, संबंधित मुख्याध्यापकांची अपत्यांची नोंद 2003, 2007 आणि 2008 अशी स्पष्ट असून, तीन अपत्य असतानाही त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. शासनाच्या दिनांक 28 मार्च 2005 च्या “लहान कुटुंब” धोरणानुसार अशा प्रकरणात निर्बंध लागू असताना नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आहे.

तसेच, पदोन्नतीपूर्वी आवश्यक असलेले “लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र” घेतल्याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. यामुळे शिक्षणाधिकारी तसेच संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकारामुळे शैक्षणिक वर्तुळात संतापाची लाट उसळली असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित पदोन्नती तात्काळ रद्द करावी, अशी मागणी तक्रारदार रमेश पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे शिक्षण विभागाची प्रतिमा मलीन झाली असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button