बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल, खामगावच्या मिल्लत कॉलनीतील घटना!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

खामगाव : संपूर्ण जिल्ह्यात चोरींचे प्रमाण वाढले आहे. चोरींच्या घटना थांबण्याचे नावच नाही खामगावच्या मिल्लत कॉलनी भागातून दुचाकी लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील रहिवाशी शेख सलीम शेख सुलेमान कुरेशी (३७) याने त्याची दुचाकी क्र. एमएच २८ एएक्स४९२३ ही घरासमोर उभी केलेली होती. दरम्यान ५ ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्याने सदर दुचाकी लंपास केली. काही वेळाने ही घटना उघडकीस आली. शेख सलीम याने सर्वत्र शोध घेतला. पण दुचाकी मिळून आली नाही. यामुळे याबाबत त्याने शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून यावरुन पोलिसांनी अज्ञात चोरटयाविरुध्द कलम ३०३(२) भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button