खासगी रुग्णालय येथे दरफलक लावावेत – इरफान मलनसकारंजा तालुका प्रतिनिधी मोहम्मद सादिक

यवतमाळ: शहरातील बहुतांश रुग्णालयात उपचाराचे दर नं लावल्यामुळे रुग्णच्या नातेवाईकांची आर्थिक लूट होत आहे, यामध्ये वाढीव बिल लावणे, जादा दर आकारणे असे प्रकार सर्रास होत आहे.
यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशांशनाने तात्काळ सर्व खासगी रुग्णालयांना आवारात दरफलक लावण्यासाठी सक्ती करावी जेणेकरून रुग्णाच्या नातेवाईकाना रुग्णालयातील विविध दराची माहिती होईल आणी त्या नुसार ते बिल अदा करतील वरील नियम नं पाळल्यास खासगी रुग्णालयाचे परवाने रद्द करावेत अशी मांगणी यवतमाळ मधील अंतराष्ट्रीय मानव अधिकार फेडरेशनचे प्रदेश अध्यक्ष श्री इरफान मलनस यांनी केली आहे इरफान मलनस यांनी याच्या आधी सुद्धा आय सी यू मध्ये मृत पावल्या नंतर सुद्धा रुगाचा खासगी रुग्णालये बिल कशे काढतात याचा सुद्धा उचलला होता, तो मुद्दा सर्व महाराष्ट्र भर गाजला होता.
शहरातील प्रत्येक खासगी रुग्णालयांनी रुग्ण हक्काची सनद व दर पत्रक (द चार्टर ऑफ पेशंट राईट्स) ची माहिती दर्शनी भागात लावणे लावणे बंधनकारक आहे, परंतु शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयामध्ये रुग्णाच्या हक्काची सनद दर्शनि भागात लावलेली निदर्शनास येत नाही.
खासगी रुग्णालयात आता रुग्णहक्क कायद्यानुसार उपचार व रुग्णसेवांचे दर याची माहिती मिळाली पाहिजे ही माहिती रुग्णांना मिळावी यासाठी केंद्र सरकारने आदेश काढलेला आहे परंतु अंमलबजावणी होत नाही रुग्णहक्काच्या सनदमध्ये रुग्णला प्राप्त झ्हालेले अधिकारामध्ये आजाराच्या प्रकाराची माहिती मिळण्याचा हक्क आदींचा समावेश आहे असे इरफान मलनस यांनी म्हटले आहे
“शांशनाच्या कायद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या रुगनालयावर तात्काळ कारवाई करावी आणी सर्व खासगी रुग्णालयांना आवारात दर फलक लावण्यासाठी सक्ती करावी”
-श्री इरफान इ मलनस
(अध्यक्ष महाराष्ट्र राज्य )
अंतराष्ट्रीय मानव अधिकार फेडरे्शनं



