OBC बांधवांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस कटींबद्ध

लवकरच जिल्ह्यात ओबीसी बांधवाना काँग्रेस पक्षाची जवाबदारी – कैलास फाटे
(जी .डी. रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी)
खामगाव : काँग्रेस पक्षाच्या वाढत्या लोकप्रियतेला पाहता बरेच दिवसापासून रखडलेली कार्यकारिणी नेमल्या जाणार असून ओबीसी विभागात पदासाठी अनेकांनी राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा अमरावती विभागाचे प्रभारी समन्वयक कैलास फाटे यांच्याकडे अनेकांनी संपर्क केला.
इच्छुक ओबीसी कार्यकर्त्यांसाठी राजकीय कार्यक्षेत्रात जवाबदारी घेऊन जनसेवा करण्यासाठी सुवर्ण संधी आहे. लवकरच योग्य कार्यकर्त्यांना पद घेऊन कार्य करण्याची संधी मिळणार असून आज भाजप सरकारकडून जनतेची होत असलेली पिळवणूक थांबावन्यासाठी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता तत्पर राहील असे कैलास फाटे यांनी सांगितले. बुलढाणा जिल्ह्यात सर्वात जास्त संख्या ओबीसिंची आहे. ओबीसी समाज हा शेतकरी, मजूर, बराबलुतेदार, व्यापारी अनेक संघर्ष करून आपला प्रपंच चालवणारा वर्ग हा ओबीसी समाज आहे त्यामुळे या सरकारमध्ये सर्वात जास्त त्रास, महागाई मुळे आर्थिक नुकसान, शेतकऱ्यांना दुष्काळातही कोणताच न्याय नाही, विध्यार्थ्यांना शिक्षणामध्ये शिषवृत्ती मिळत नाही, आरक्षण हे कागदापुरते असून प्रत्यक्षात आरक्षणाप्रमाणे कोणतीच जागा भरल्या गेली नाही ह्या सर्व समस्या सोडविण्याकरिता काँग्रेस ओबीसी विभागाचा शिपाई लढण्याकरिता व न्याय मिळवून देण्याकरिता सज्ज राहील असे कैलास फाटे यांनी यावेळी सांगितले असून योग्य ओबीसी बांधवांनी समोर यावे असे आवाहन केले……✒️



