बुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भ

*पतंजली परिवाराच्या सर्व संघटन मिळून बुलढाणा जिल्ह्याचा रामनवमी उत्सव आनंदात साजरा*

-नित्य योगवर्ग भटृड जीन येथे आज दिनांक 30 /3 /2023 रोजी सकाळी मोठया उत्स्फूर्तपणे पार पडला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष  नित्य योग वर्गाचे आधारस्तंभ रमेशजी भट्टड  हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला होम-हवन  विधी आदरणीय कैलासचंद्रजी चौधरी यांच्या सहकार्याने पार पडला.कार्यक्रमात महाराष्ट्र पूर्व प्रांत सह-कोषाध्यक्ष आदरणीय प्रल्हादजी सुलताने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी रामनवमी हा दिवस परमपूज्य योग गुरू स्वामी रामदेव बाबा यांचा संन्यास दिवस असून योगपरीवारासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी चतुर्भुजजी मिटकरी भारत स्वाभिमान जिल्हा बुलडाणा, जिल्हा कोषाध्यक्ष निळकंठजी साबळे, किसान सेवा समिती चे जिल्हा प्रभारी पुरुषोत्तमजी पाटील, बुलढाणा जिल्हा योग समितीचे दशरथजी लोणकर ,जिल्हा युवा प्रभारी हरिदासजी सोळंके, महामंत्री बाबुरावजी रोकडे,महिला पतंजली च्या तालुकाअध्यक्षा वर्षाताई सरप ,भाजपा महिला जिल्हा सरचिटणीस कल्पनाताई मसने ,व्यासपीठावर उपस्थितहोते.*
*सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी दीपक जी सरप,रवींद्रजी हेलोडे, हरीश जी चिंचोळकर, सविता ताई इंदोरे, धुमाळे काकू,इत्यादी मथुरा लॉन व  भट्टडजीन योगवर्गाचेसर्व योग साधक व योग साधिका उपस्थित होते.
शेवटी कार्यक्रमाचे समापन शांती पाठाने झाले.( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button