धावत्या रेल्वेत विनयभंग करत महिलेला ढकलून देण्याचा प्रयत्न, आरोपीला रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

*धावत्या रेल्वेत विनयभंग करत महिलेला ढकलून देण्याचा प्रयत्न, आरोपीला रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
*आपण रेल्वे स्टेशनवर चोरी झाल्याच्या घटना नेहमी ऐकत असतो. पण दिवसेंदिवस या घटनांचे प्रमाण हे वाढत आहे. रविवारी उद्यान एक्सप्रेसमध्ये एका चोरट्याने प्रवासी महिलेचा विनयभंग करत तिच्याकडील बॅग खेचली.तिला ट्रेनमधून बाहेर ढकलले. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.मुंबई : उद्यान एक्सप्रेसमध्ये प्रवासी महिलेची बॅग जबरदस्तीने खेचणाऱ्या व तिला गाडीतून ढकलुन देणाऱ्या आरोपीला गुन्हा दाखल करण्यापूर्वीच रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव मनोज चौधरी (वय वर्ष 32) आहे. ही कारवाई दादर रेल्वे पोलिसांनी केली आहे. 6 ऑगस्टला दुपारी 4 वाजण्याचे सुमारास एक महिला प्रवासी ही पुणे रेल्वे स्टेशन येथुन उद्यान एक्सप्रेसच्या गार्ड बाजुकडील महिलांच्या जनरल डब्यामधून मुंबई सीएसएमटी रेल्वे स्टेशनकरीता प्रवास करीत होती. ही उद्यान एक्सप्रेस ही रात्री साडेआठ वाजता दादर रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक ६ वर आली. तेव्हा ही घटना घडली.डब्याच्या दरवाज्यातून बाहेर ढकलले : या रेल्वेतील प्रवास करणाऱ्या इतर महिला प्रवासी फलाटाव



