बुलढाणामहाराष्ट्र

तेल्हारा शहरात पत्रकार दिन उत्साहात साजरा

तेल्हारा शहरात पत्रकार दिन उत्साहात साजरा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तालुका प्रतिनिधी

तेल्हारा ; तेल्हारा शहरात नविन बनलेल्या तालुक्यातील प्रथम पत्रकार भवन ,आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर सभागृहाच्या वास्तु मध्ये मराठी पत्रकार परिषद संलग्नित तेल्हारा तालुका पत्रकार संघाच्यावतीने ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. प्रथम आद्य. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हारार्पण व दीप प्रज्वलन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमात पत्रकार प्रा. कृष्णा फंदाट यांनी मराठी पत्रकार सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी चितोडे गुरुजी, भवानी प्रताप, रामाभाऊ फाटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या ठिकाणी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्र.सु. ठोकणे, जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणी सदस्य सुरेश शिंगणारे, बाळासाहेब सावरकर, पत्रकार अनंत अहेरकर, प्रा. कृष्णा फंदाट, अनिल अवताडे, रवी शर्मा, अनिल जोशी, राहुल मिटकरी, सुरेश सिसोदिया, अमित काकड, निलेश जवकार, विलास बेलाडकर, रामाभाऊ फाटकर, प्रशांत विखे, धर्मेश चौधरी, सदानंद खारोडे उत्तम नळकांडे, विजय घोडे, सागर नराजे, सामाजिक कार्यकर्ते धीरज बकाल, जितेंद्र राठी, लोकजागर मंचचे अनिल गावंडे, सागर मते, गोपाल जळमकार, अंकुश सपकाळ, दीपक अहेरकर, सुनील धुरडे आदींनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहुन त्यांच्या स्मृतीला अभिवादन करत सर्व उपस्थित पत्रकारांना आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट प्रास्ताविक, संचालन व आभार प्रदर्शन प्रसिद्ध पत्रकार प्रा. कृष्णा फंदाट यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच तेल्हारा तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी तथा इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडियाचे पत्रकार आवर्जून उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button