एका अधिकाऱ्याकडून वाहनांची तोडफोड

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव : येथील शहर पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने .२ मार्च रोजी मध्यरात्री स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही गाड्यांची तोडफोड केल्याची घटना तारीख २ मार्च रोजी मध्यरात्री घडली.
याबाबत प्राप्त माहिती अशी की रात्रीच्या वेळी अवैधरीत्या चोरट्या मागनि रितीची वाहतूक शेगाव शहरात व परिसरात मोठ्या प्रमाणात होत असते.
वाळू माफियांची टोळी रात्री बरेचदा उशिरापर्यंत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल व अन्य काही ठिकाणी उभे असतात. २ मार्च रोजी रात्री पहूर पूर्ण येथील एकाचा अपघात झाल्याने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही वाहने उभी करून सदर अपघाताचे ठिकाणी मदत कार्यात रेतीचा व्यवसाय करणारे काही जण गेले होते. दरम्यान शहरात पेट्रोलिंग गस्त करत पोलिस व्हॅन मध्ये आलेल्या एका शहर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यास मंदिराकडून येत असताना काही मोटरसायकली तसेच रेतीच्या गाड्या व अन्य काही चार चाकी वाहने उभे दिसल्याने ते गाडीतून उतरले. रात्रीच्या वेळी भर चौकात उभी असणारी मोटरसायकल तसेच चार चाकी वाहने बघून त्यांचा पारा चढला असावा म्हणून त्यांनी थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांची तोडफोड केली. कर्मचाऱ्याने त्यांना वाहनात बसवून रवाना केले, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.



