Uncategorizedखानदेशमहाराष्ट्रराजकीय

उद्धव ठाकरेंच्या सेनेला पुन्हा भगदाड! शिंदे सेनेत पक्षप्रवेश होताच राजकीय हालचालींना वेग

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने भक्कम कामगिरी करत आघाडी घेतली आहे. सुरुवातीला झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांत भाजप पहिल्या क्रमांकावर राहिला, तर शिवसेना शिंदे गटाने दुसरे स्थान पटकावले. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकांमध्येही महाविकास आघाडीला मोठा धक्का देत भाजपने पुन्हा एकदा आघाडी राखली तर शिवसेना शिंदे गटालाही या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने प्रभावी उपस्थिती दर्शवत सत्ता समीकरणांमध्ये वर्चस्व राखले. दरम्यान निवडणूक काळात विविध पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षांतर झाल्याचेही पाहायला मिळाले. काही ठिकाणी याचा परिणाम शिवसेना ठाकरे गटावर झाल्याचे स्पष्ट झाले.दरम्यान, डोंबिवलीतून आणखी एक राजकीय घडामोड समोर आली आहे. निवडणुका संपल्यानंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा पार पडला. ठाकरे गटातील विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख तसेच अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटाची साथ स्वीकारत. डोंबिवलीत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.याआधी विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अनेक नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत शिवसेना शिंदे गट किंवा भाजपमध्ये प्रवेश केला. हे पक्षांतराचे सत्र अद्याप सुरूच असल्याचे चित्र आहे. सततच्या या घडामोडींमुळे ठाकरे गटासमोर संघटन मजबूत ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button