शेतातील साहित्याची चोरी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहुरकर
जलंब जवळच असलेल्या माटरगाव शिवारातील एका शेतातील केबल वायरसह १० हजार रुपयाचे शेतीचे साहित्य ३ चोरट्यानी लंपास केल्याची घटना ५ नोव्हेंबर पूर्वी घडली असून पोलिसांनी ३ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत वृत्त
तिघांविरुध्द गुन्हा दाखल गणेश निनाजी खवले

असे की जलब पो. स्टे अंतर्गत जवळच असलेल्या कठोरा ता. शेगाव येथील शेतकरी यांचे माटरगाव शिवारात असलेल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेले असता त्यांच्या शेतातील केबल ११०० फुट, स्टार्टर कट आउट, ऑटो वोल असा असा एकूण १० हजार ६०० रुपयाचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. अशी तक्रार फिर्यादी गणेश खवले यांनी जलंब पोस्टेला दिली यावरून पोलिसांनी आरोपी उद्धव देठे रा. डोलारखेड व २ अनोळखी इसमा विरुद्ध अपराध नं. २२८/२०२३ कलम ३७९, ३४ भादवी अन्ये गुन्हा दाखल केला आहे.. पुढील तपास ठाणेदार अमोल बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका सचिन बावने हे करित आहे.




