बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
प्रशासन, कामगार आणि पक्षही कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्यावर नाराज!!!

*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस*
*तालुका प्रतिनिधी ,रतन भगत*
*संग्रामपूर*
अकोला दि.१/८/२६ सविस्तर वृत्त असे की अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांच्यावर मंत्री म्हणून नाराजी वाटत असून पक्षाच्या एका तटस्थ यंत्रणेने त्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केल्याने आणि कामगार क्षेत्रातील त्यांच्या कामावर असमाधानाचे वातावरण असल्याने आगामी काळात त्यांना पर्याय शोधला जात असल्याची माहिती संबंधीत सूत्रांकडून मिळाली आहे. ना .आकाश फुंडकर यांना पक्षाने थेट कॅबिनेट मंत्री पदावर संधी देऊन आता पावणे दोन वर्षाचा कालावधीत लोटला असला तरी त्यांनी राज्यस्तरावर अपेक्षित अशी कोणत्याच प्रकारची कामगिरी केली नाही .शिवाय कामगार क्षेत्रात कार्यरत अनेक संघटनांची नाराजी ओढून घेतले असून कामगार संघटनांच्या महासंघाने तर त्यांच्या हकालपट्टीची मागणी लावून धरली आहे. विविध कामगार क्षेत्रात पक्षाची स्थिती मजबूत करीत पक्षाच्या कामात कामगारांचा सहभाग वाढवण्याची त्यांच्याकडे दिलेल्या जबाबदारीत ते नापास झाल्याचे पक्षाचे नेत्यांची तक्रार असून पक्षाने खात्याच्या कामाची मतदार संघात त्यांचा अधिक वेळ जात असल्याच्या सुद्धा तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षातील अनेक ज्येष्ठ आमदार आणि जुन्या पदाधिकाऱ्यांच्या मते ना. आकाश फुडकर फोनवर उपलब्ध होत नाहीत .शिवाय मंत्रालयात खात्याच्या कामाला हवा तसा वेळ पण देत नाहीत. आकाश फुंडकर अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत .मात्र अकोल्यात सुद्धा काही विशिष्ट नेत्यांच्या सल्ल्यावरच कार्यवाही करतात. या नेत्यांची मर्जी न सांभाळणाऱ्या पक्षाच्या अनेक लोकांचे कामे होत नसल्याची कुजबुज ही पक्षात वाढली आहे. अशी माहिती पक्षाकडून मिळालेले आहे.
*कामगार खात्यात सुद्धा नाराजी*
दरवर्षी कामगार खात्यातर्फे कामगार साहित्य संमेलन आयोजित केले जात असते. यावर्षी ते शेगाव येथे आयोजित करण्याचा प्रस्ताव घेऊन कामगार कल्याण मंडळाचे काही अधिकारी गेली वर्षभर त्यांच्याकडे चकरा मारीत आहेत, मात्र त्यासाठी सुद्धा कामगार मंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने दुसऱ्या बाजूला कामगार साहित्यिक आणि कल्याण मंडळाच्या अधिकारी वर्गात नाराजी वाढताना दिसत आहे.



