वासुदेवजी महाराज अवतिर्णोत्सव निमित्त सप्ताहाचे आयोजन , पंचक्रोशीतील सर्व भाविक सद्भक्तांनी तन, मन, धनाने सहकार्य करावे ; ज्ञानेश्वर महाराज भालतिलक

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
वारी भैरवगड दि २६:
अकोला जिल्ह्याच्या सीमेवर असलेले वारी हनुमान भैरवगड , श्री ज्ञाणेश आश्रम येथे सालाबाद प्रमाणे गत आठ वर्षापासून श्री संत वासुदेव जी महाराज अवतिर्णोत्सव तथा मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचे औचित्य साधून दि ५ मार्च ते १२ मार्च २०२४ पर्यंत भव्य प्रमाणामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा योगी सम्राट श्री संत गजानन महाराज चरित्र प्रवचन सप्ताहाचे आयोजन केले आहे.
सदर्हू कार्यक्रमात दररोज पहाटे ५ ते ६ काकडा भजन, ६ ते ७ विष्णुसहस्त्रनाम तथा गोपी गीत व भ्रमरगीत पठण , ८ ते १ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तसेच दुपारी ३ ते ५ श्री भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या मुखारंविदातून श्री संत गजानन महाराज चरित्र कथा प्रवचन व सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्रौ ७ ते ९ यावेळेत श्री माऊली सर्वांगीण विकास बाल संस्कार शिबिरातील आजी-माजी विद्यार्थी महाराज मंडळीचे सुश्राव्य हरी कीर्तने होतील.
दि. ११ मार्च ला रात्रौ ८ ते १० या वेळेत श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांचे हरिकीर्तन तसेच दि.१२ मार्च ला सकाळी ८ ते १० पर्यंत श्रींच्या अवतिर्णोत्सवा निमित्ताने अभिषेक व सकाळी १० ते १२ या वेळेत गुरूवर्य श्री विठ्ठल महाराज कोरडे यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होईल .
तरी उपरोक्त कार्यक्रमा करीता पंचक्रोशीतील सर्व भाविक सद्भक्तांनी तन, मन, धनाने सहकार्य करावे असे आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक यांनी केले आहे.



