क्राईमगुन्हेगारीजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगरमध्ये जुगार खेळताना पाच इसम रंगेहाथ पकडले – रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर शहरातील बोदवड रोडवरील हॉटेल विहानच्या आडोश्याला मोकळ्या जागेत ५२ पानांच्या पत्त्यांवर हारजितीचा झन्नामन्ना जुगार खेळणाऱ्या पाच इसमांवर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत रोख २४,४३० रुपये व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले असून संबंधितांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुगार खेळत असलेल्या इसमांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

सोमनाथ लक्ष्मण पाटील (वय ३२ वर्षे, रा. उचंदा , ता. मुक्ताईनगर)
अरुण नामदेव पालवे (वय ५७ वर्षे, रा. गोदावरी मंगल कार्यालयाजवळ, मुक्ताईनगर)
निलेश लिलाधर वाणी (वय ५२ वर्षे, रा. गोदावरी मंगल कार्यालयाजवळ, मुक्ताईनगर)
अरविंद मधुकर घोगरे (वय ५२ वर्षे, रा. निमखेडी, ता. मुक्ताईनगर)
रमेश नारायण सापधरे (वय ६० वर्षे, रा. संभाजी नगर, मुक्ताईनगर)
पोलिसांनी पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत खालील प्रमाणे रोख रक्कम व साहित्य जप्त करण्यात आले:

रोख १५,०००/- रुपये (५०० व २०० रूपयांच्या नोटा)
७,७००/- रुपये सोमनाथ पाटील यांच्याकडून
१,१००/- रुपये रमेश सापधरे यांच्याकडून
४००/- रुपये अरुण पालवे यांच्याकडून
२३०/- रुपये अरविंद घोगरे यांच्याकडून
५२ पानांचे दोन कॅट (जुगाराचे पत्ते)
एकूण मिळून २४,४३०/- रुपये रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले.

सदर प्रकरणी संबंधित इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button