नागेशभाऊचे प्रसिध्द कढी भजे

वाशिम जिल्हा प्रतिनिधि
वाशिम शहरातील बसस्थानकनजीक असलेल्या नागेश गंगावणे नामक युवकाने सुरु केलेल्या नाश्ता सेंटरवरील कढी भजे अल्पावधीच चांगले प्रसिध्द झाले आहे.
प्रस्तुत टेस्टी कट्टा
कुठे? बसस्थानकाच्या बाजुला काय खाल? कढी भजे, कढी खिचडी, चमकुरा भजे, इतर भजे
वाशिम : वाशिम शहरातील बसस्थानकाच्या बाजुला देपूल येथील एका नागेश गंगावणे नामक युवकाने नाश्ता सेंटर सुरु केले आहे. यांच्या सेंटरवर मिळत असलेली वारंगा खिचडी-कढी, गरमागरम भजे, मुंग भजे, चमकुरा भजेसह विविध प्रकारचे भजे शहरात चांगलेच प्रसिध्द झाले आहेत. नागेशच्या मनमिळावू स्वभाव तसेच ते स्वतः इन्स्टाग्राम स्टार असल्याने त्यावर व्हायरल होत असलेल्या व्हीडीओमुळे नागरिक येथील खाद्य पदार्थाची चव चाखण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. नाश्ता सेंटरवर स्वच्छता पाळल्या जात असून येथे नियमित गर्दी दिसून येत आहे.



