स्वतःचा रोजगार उपलब्ध करून दुसऱ्यांना सुद्धा रोजगार देऊ शकणारे एकमेव शिक्षण म्हणजे आय टी आयः आ राजेश एकडे

स्टार भारत लाइव महाराष्ट्र एक्सप्रेस
बुलडाणा जिल्हा प्रतिनिधि
ऋषिकेश देठे
,”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
मलकापूरः औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत घेतलेल्या शिक्षणामुळे विद्यार्थी स्वतःचा रोजगार उपलब्ध करून दुसऱ्यांना सुद्धा रोजगार देऊ शकणारे असे एकमेव शिक्षण असेल तर ते आय टी आय आहे तेथून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला रोजगार निश्चित मिळतो असे प्रतिपादन आ राजेश एकडे यांनी महाराष्ट्र शासनाचा कौशल्य रोजगार उद्योजकता आणी नाविन्य विभाग व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मलकापूर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदुरा यांच्या संयुक्त विद्यमाने १५मे २०२३रोजी मलकापूर येथील शासकीय आय टी आय येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबीरात उद्घाटक म्हणून केले
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक भरतकुमार दंड यांची उपस्थिती होती
पुढे बोलताना आ एकडे म्हणाले की मलकापूर विधानसभा मतदार संघात दोन आय टी आय असून प्रत्येक आय टी आय ला १०संगणक देण्यात येतील तसेच मलकापूर व नांदुरा प्रत्येकी दोन अशा चार तुकड्यांना सुद्धा लवकरात लवकर मंत्रालयातून मंजूरी घेऊन येऊ
त्याचप्रमाणे मलकापूर शहरात साडे सहा कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या अभ्यासिकेत एक प्रशस्त हॉल विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनासाठी ठेवण्यात आला असून विद्यार्थ्यांना भविष्यात याचा मोठ्या प्रमाणात निश्चितच फायदा होणार आहे
या शिबिरात “करिअरच्या संधी “
या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ रागीब अहमद (आंतरराष्ट्रीय वक्ते) जळगाव,राहुल पळवेकर प्राचार्य शा औ प्र सं घाटंजी,प्रफुल्ल खाचणे अभियंता, उद्योजक लक्ष्मी इंजिनिअरिंग मलकापूर व अनंता दिवनाले तंत्रज्ञ महावितरण, मलकापूर या विविध क्षेत्रातील तज्ञांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले
शिबीराला आय टी आय च्या विद्यार्थी व विद्यार्थ्यीनींची लक्षणीय उपस्थिती होती



