महाराष्ट्रशैक्षणिक

कौशल्य विकास योजनेअंतर्गत एस के के कॉलेज मध्ये आभासी उद्घाटन

कौशल्य विकास योजनेअंतर्गत एस के के कॉलेज मध्ये आभासी उद्घाटन

एच एम इंदोरे प्रतिनिधी

जळगाव जामोद महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास योजनेअंतर्गत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगाव जामोद येथे कौशल्य विकास करिन्यकारिता बुलढाणा जिल्ह्यातून निवड करण्यात आली होती याकरिता महाविद्यालयामध्ये दोन कौशल्य विकास योजना राबविण्याची उद्दिष्ट बुलढाणा जिल्ह्यातून देण्यात आले होते यामध्ये ब्युटीशियन हा मुलींकरता कौशल्य विकास कार्यक्रम तसेच कॉम्प्युटर फंडामेंटल हा कार्यक्रम करण्याकरिता खुला करण्यात आला आहे. या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थी न्यू शुल्क पणे प्रवेश करून आपला प्रवेश निश्चित करू शकतात. नवीन शैक्षणिक धोरण तसेच सीबीसीएस अंतर्गत कौशल्य विकास कार्यक्रम आवश्यक करण्यात आलेले आहेत. याकरिता हे कोर्सेस सुद्धा महत्त्वपूर्ण ठरू शकतात या कार्यक्रमाकरिता बुलढाणा जिल्ह्याचे समन्वयक गोपाल चव्हाण बुलढाणा जिल्हा हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अतिथी म्हणून जळगाव शिक्षण मंडळ अनुप पुराणिक एस पी ओ सी कौशल्य विकास कार्यक्रम तसेच प्राचार्य डॉ प्रवीण डांबरे हे आभासी कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापक मंडळी शिक्षकेतर कर्मचारी प्रा माई प्रा विप्रदास प्रा कुलकर्णी प्रा कातोरे तसेच सहसचिव मिलिंद जोशी जळगाव शिक्षण मंडळ जळगाव जामोद प्रभारी अधीक्षक संजय गाडेकर उपस्थित होते या आभासी पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महाविद्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांनी परिश्रम केले यावेळी महाविद्यालयातील मुले व मुली उपस्थित होते✍🏾

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button