अकोला जिल्ह्यातील पातुर तालुका पाढुर्णा या गावांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या व बिरसा मुंडा यांच्या नावाच्या प्रवेशद्वाराचे अनावरण उद्घाटन करण्यात आले

*अकोला जिल्ह्यातील पातुर तालुका पाढुर्णा या गावांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या व बिरसा मुंडा यांच्या नावाच्या प्रवेशद्वाराचे अनावरण उद्घाटन करण्यात आले
रविवार दि.१०/मार्च/२०२४ ला सकाळी १२ वाजता हा ऐतिहासिक कार्यक्रम झाले याच, प्रवेशद्वारासाठी एक महिन्यापासून संघर्ष सुरू होता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या प्रवेशद्वारासाठी दोन भीमसैनिकांनी विष प्राशन करून आत्महत्या सुद्धा देण्याची तयारी केली होती मोर्चे निवेदन देऊन हा लढा तीव्र केला होता गावातील सर्व महिलांनी पुरुषांनी युवकांनी हा लढा मजबूत केला जिल्हा अधीक्षक यांच्या कार्यालयावर मोठा मोर्चा सुद्धा नेण्यात आला होता शेवटी या प्रवेशद्वाराच्या मागण्या पूर्ण झाल्या आणि ज्याच्यासाठी एवढा मोठा संघर्ष एक महिन्यापासून चालू होता त्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वाराचे ऐतिहासिक अनावरण आज पार पडले या कार्यक्रमांमध्ये गावातील सर्व महिला पुरुष युववर्ग व पातुर तालुक्यातील सर्व भीमसैनिक उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीमध्ये या प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात आले,काढलेली कमाण त्या ठिकाणी पुन्हा लावून दाखवली हे भीमसैनिकांची ताकत आहे पावर ऑफ जय भीम, सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य,आकाश दादा शिरसाट,,*



