माळपिंपरी ऑन क्रुशीयल पॉइंट!

माळ पिंपरी हे गाव आता जळगावच्या नकाशावर झळकते आहे.पुढे महाराष्ट्र आणि भारतात या गावाची ओळख होईलच.युनोला सुद्धा यांची दखल घ्यावी लागणार.जळगांव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील हे गाव.भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील हे गाव.येथील शेतकरी आज न्यायाची भीक मागत आहे.पण प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेते दाद देत नाहीत.येथे प्रशासन कोलमडले.ठप्प झाले.या नोकरांवर कोणत्याही राजकीय नेत्यांचे,आमदारांचे, मंत्रीचे, महसूलमंत्रीचे,मुख्यमंत्रीचे असे नियंत्रण राहिलेले नाही.जसा राज्यकारभार युगांडा , केनिया मधे चालतो ,तसाच कारभार येथे चालतो.ज्याच्या हाती ससा तोच शिकारी.जो कमजोर तो भिकारी.
माळपिंपरी शिवारातील गट नंबर १०७ आणि गट १०५ एकमेकांना लागून आहेत.गट १०७ चे क्षेत्र सातबारा व भुमिअभिलेख मधील रेकॉर्ड वर ३.९३ हेक्टर आर आहे.गट १०५ चे क्षेत्र सातबारा व भुमिअभिलेख मधील रेकॉर्ड वर २.८६ हेक्टर आर आहे.
गट नंबर १०५ च्या मालकाने पैकी अडीच एकर क्षेत्र गावातील एका शेतकरीला विकले.परंतु प्रत्यक्ष कब्जा मात्र गट नंबर १०७ मधे दिला.याची जाणिव गट नंबर १०५ चे मालक,गट नंबर १०७ चे मालक आणि गट १०५मधून जमीन खरेदी करणारे मालक असे तिघांना आहे.तरीही एका गटातून खरेदी आणि दुसऱ्या गटातून कब्जा.असा गैरप्रकार ग्रामीण पातळीवर झाला आहे.याबाबत संपूर्ण गावकरी ज्ञात आहेत.तरीही न्याय निवाडा होत नाही .येथे कुरूक्षेत्राचे स्मरण होते.तेथे युद्ध का झाले असावे?गावगाडा,चावडी , ग्रामपंचायत, पोलिस पाटील या यंत्रणा येथे फेल ठरल्यात.महसूल,भुमिअभिलेख,पोलिस या यंत्रणा येथे फेल ठरल्यात.आता सर्वच खात्यातील अधिकारी कोर्टाकडे बोट दाखवत आहेत.आधीच भुमिअभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी चौदा महिने दाद दिली नाही.मोजणी फी साडेचार हजार आणि घेतले अठरा हजार.तरीही शेत मोजणी करुन दिली नाही.येथूनच शेतकऱ्याची दैना सुरू झाली.त्याची हेटाळणी,लाथाळणी, कुचंबणा, अपमान,फिराफिर सुरू झाली.आतापर्यंत या शेतकऱ्याने चाळीस हजार रुपये खर्च केलेत.परंतु न्याय मिळाला नाही.
प्रशासकीय यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राजकीय यंत्रणा असते.त्यात गिरीश महाजन हे पंचवीस वर्षांपासून आमदार आहेत.तीन वेळा मंत्री झालेत.त्यांच्याच मतदारसंघातील एक शेतकरी,त्यांचाच मतदार दरदर भटकतो,न्याय मागतो,मदत मागतो.पण कोणीही दाद देत नाही.कोणीही मदत करीत नाही.काय हेतू असावा ?आपसात लढा आणि मरा?
जामनेर विधानसभा मतदारसंघ आणि रावेर मतदारसंघात भाजपचे नेते, हिंदुस्थानचे शहेनशहा नरेंद्र मोदी यांच्याच पक्षाकडे आहे.मागील पंचवीस वर्षांपासून.याच तालुक्यातील गोद्री येथे मोठा कु़ंभमेळा भरला.चार पांचशे कोटींचा चुराडा केला.युपीचा मुख्यमंत्री आणून पुजा केली.देवांना प्रसन्न करण्यासाठी.पण दानवांच्या पुजेला देवाने प्रतिसाद दिला नाही.दानवच हे.ज्यांचेकडे कोणतीही न्याय बुद्धी नाही.हे दानव मानव जमातीवर राज करीत आहेत.शेतकऱ्यांच्या छातीवर गिधाडासारखे नाचत आहेत.
या दानवांच्या राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्यात आले.साडेतीन हजार पोलिस तैनात होते.श्रोत्यांपेक्षा पोलिस जास्त .केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले तेव्हाही चार हजार पोलिस तैनात होते.श्रोत्यापेक्षा पोलिस जास्त.पण शेतकऱ्यांचे शेत मोजणी साठी एक पोलिस मिळाला नाही.या सरकारला शेतकरीची किती जाणिव असावी? यावरून निष्कर्ष निघतो कि,मानवी रूपातील हे दानव भारतावर राज्य करीत असावेत.लंका सोन्याची सांगतात पण जुलूम जबरदस्ती कमी होत नाही.
आज भारतात दानवांची सत्ता आहे म्हणून कोणी मानव यांच्या विरोधात बोलत नाहीत.कारण विरोधातील कोणत्याही मानवाला हे जेलमध्ये टाकतात.कृष्णाच्या माता पित्यांना अंश मामाने जेलमध्ये टाकलेच होते.पण मी बोलतो,लिहीतो.कारण ही जबाबदारी देवाने माझ्या कडे सोपवलेली आहे.मानवाचे दुख कमी करण्यासाठी जोखीम घेण्याची.
जर महर्षी वाल्मिक ऋषींनी राम आणि रावण यांच्या काळातच रामायण लिहिले असते.त्यात उल्लेख केला असता कि,कट कारस्थान करून रावणाने सीताहरण केले आहे.आणि हे जर रावणाच्या लक्षात आले असते किंवा कोणीतरी सांगितले असते तर रावणाने वाल्मिक ऋषींचा वध केला असता.कारण रामाची पत्नी पळवून नेण्याचा अधिकार रावणाला होता.असा रावणाचा समज होता.तसाच समज आता भारतातील दानव राजांचा झाला आहे.मानवाचे शोषण करणे दानवांचा अधिकार आहे.
..शिवराम पाटील.
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव



