
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगांव येथील कृषी उत्पन्न – बाजार समिती व महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांचे संयुक्त विद्यमाने नाफेड ची शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सोयाबीन – या शेतीमालाचे खरेदीचा – शुभारंभ उपबाजार माटरगाव – बु. येथे बाजार समितीचे सभापती गोपाळराव मिरगे, उपसभापती श्रीकांत तायडे – यांचे हस्ते करण्यात आला. बाजार समिती मार्केटिंग – फेडरेशन अंतर्गत सबएजंट म्हणून सदर खरेदी करीत असून सोयाबीन या शेतमालाला रुपये ४६००/- हमीभाव शेतकऱ्यांना देणार आहे. शेतकऱ्यांकरिता शेगाव व माटरगाव या दोन्ही ठिकाणी
नोंदणी करिता व्यवस्था केली
असून शेतक-यांनी सन २०२३- २४ या वर्षाचा अद्यावत पीक पेरासह सातबारा, बँक पासबुक लिंक असलेले आधार कार्ड ची स्पाट झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स किंवा कॅन्सल चेक, व नोंदणी अर्ज भरून वरील कागदपत्रे दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ पर्यंतच घेऊन येऊन बाजार समितीचे मुख्य बाजार शेगाव किंवा उपबाजार माटरगाव येथे शेतकऱ्यांनी सादर करावित व आपला नोंदणी क्रमांक प्राप्त
करून घ्यावा असे आवाहन यावेळी बाजार समितीचे सभापती गोपाळराव मिरगे यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी खरेदी केंद्रावर शेतमाल घेऊन आलेल्या बेलुरा येथील शेतकरी प्रभाकर रामचंद्र सुलतान तसेच माटरगाव येथील शेतकरी सिकंदर हकीमखा पटेल यांना बाजार समितीचे सभापती, उपसभापती यांनी शेला, टोपी, श्रीफळ व हार घालून सत्कार



