विदर्भसामाजिक

तेल्हारा शहरात रिलायन्स टॉवर जवळ आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.२७ ; तेल्हारा शहरातील रामनगर येथील डॉ. मल्ल यांच्या दवाखान्या समोरील रिलायन्स टॉवर जवळ एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळुन आल्याची घटना सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे
त्यामुळे तेल्हारा परिसरात एकच खळबळ उडाली असुन या अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याचे कार्य तेल्हारा पोलीस युद्ध पातळीवर करीत आहे.

आज शनिवार दि २७ जानेवारी २०२४ रोजी तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीतील रामनगर स्थित डॉ. मल्ल यांच्या दवाखान्यात समोरील रिलायन्स टॉवरच्या बाहेरील गेट जवळ फिर्यादी राजेश रामनिवास शर्मा (४५) रा. रामनगर तेल्हारा यांना सकाळी आठ वाजताच्या सुमारास मृत अवस्थेत पडलेला एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याचे निदर्शनास आल्याने फिर्यादी राजेश रामनिवास शर्मा यांनी तात्काळ ही माहिती तेल्हारा पोलीसांना कळविली . तेल्हारा पोलिसांना ही माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले व हा मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथील शवगृहात ठेवण्यात आला असून अद्यापपर्यंत सदर अनोळखी मृतक इसमाची ओळख पटली नसून तेल्हारा पोलिसांचे ओळख पटवण्याचे कार्य हे युद्ध पातळीवर सुरू आहे .
आढळलेल्या अनोळखी मृत इसमाचे वय अं ५० वर्ष ,व रंग -सावळा ,चेहरा -लांबट ,डोळे -बारीक , उंची-०५’ ०४” इंच ,नाक -सरळ ,केस -काळे ,अंगात -पांढऱ्या रंगाचे कपडे ,ठिपके असलेले टी-शर्ट पांढऱ्या रंगाचा पॅन्ट व ब्राऊन रंगाची चप्पल अशा वर्णनाचे कोणी बेपत्ता व्यक्ती असल्यास त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ तेल्हारा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन तेल्हारा पोलीस स्टेशन यांनी केले आहे.

१) पो. स्टे. तेल्हारा ठाणेदार सचिन यादव मो. नं.-९०४९२३४३०३

२) पो.उप.नि. निलेश ठाकरे पो. स्टे.तेल्हारा मो.नं-९६६५८३९७६४

३) पो कॉ. गजानन इंगळे पो.स्टे.तेल्हारा मो.नं.९०११३६७७७८

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button