बुलढाणा

न.प. तेल्हारा अंतर्गत शहरात स्वच्छ तीर्थ व महास्वच्छता अभियान!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा ; अयोध्येतील मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा व मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या या पावन पर्वावर नगर परिषद तेल्हारा अंतर्गत शहरात स्वच्छ तीर्थ व महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांनी स्वच्छ तीर्थ मोहीम व स्वच्छता मोहीम डीप क्लीन ड्राईव्ह राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत याच अनुषंगाने तेल्हारा नगरपरिषदच्या वतीने मुख्याधिकारी श्री.सतिश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहिमेअंतर्गत शहरातील विविध मंदिरे,धार्मिक स्थळे,मुख्य रस्ते,स्मारके,बाग-बगीचे, क्रिडांगणे, चौक, बाजारपेठा यांची स्वच्छता करून त्यांच्या आजूबाजूच्या परिसराची झाडे- झुडपे,गवत काढून सखोल स्वच्छता करण्यात आली.तसेच मंदिरे व धार्मिक स्थळे वॉटर टँकर व फायरेक्स द्वारे सखोल स्वच्छता सुद्धा करण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत १८ जानेवारी २०२४ ते २१ जानेवारी २०२४ या कालावधीत श्रीराम मंदिर श्रीबालाजी मंदिर, हनुमान मंदिर तेल्हारा खुर्द,श्री मारुती मंदिर कसबा, सिद्धिविनायक मंदिर, दुर्गा माता मंदिर, लटियाल भवानी मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर माधवनगर, हनुमान मंदिर माधवनगर, अंबादेवी मंदिर, साईबाबा संस्थान, पुष्करना मंदिर, गौतमेश्वर मंदिर ,गजानन महाराज मंदिर शिवाजी चौक, सुपीनाथ महाराज मंदिर,तसेच मुख्य रस्ता, बस डेपो,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व माँ जिजाऊ उद्यान डॉ. आंबेडकर स्मारक, टावर चौक, पोस्ट ऑफिस या परिसरात न.प.स्वच्छता विभाग, अग्निशमन विभाग व विविध विभागात कार्यरत अधिकारी रुपेश जोगदंड,निनाद आचार्य, मंगेश डोरले,संदीप बायाड,मुकेश बघ्गान,विजय आडे हे व इतर कर्मचारी यांच्या विशेष चमुद्वारे या परिसरात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button