विदर्भसामाजिक

आत्मक्लेश पायी मोर्चात सहभागी होण्यासाठी महिलांची गावोगावी जय्यत तयारी सुरू..

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

नैसर्गिक आपत्ती झालेल्या संग्रामपूर,शेगाव,जळगाव तालुक्यातील महिला बचत गटांचे कर्ज माफ करा व शासन निर्णयानुसार ५ वर्षाची व्याजाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा करा. या मागणीसाठी शुक्रवार दि.१९ जानेवारी जळगाव जामोद येथे होणाऱ्या शेतकरी, शेतमजुर,व महिलांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सुरू असलेल्या आत्मक्लेश पायी मोर्चात सहभागी होण्यासाठी गावोगावी बचत गट महिलांच्या नियोजन बैठका होत आहेत. खासदार राजू शेट्टी व स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांतभाऊ डिक्कर यांची पायी यात्रा जळगाव जामोद येथे शुक्रवार दि.१९ जानेवारी १२ वाजता एस डि ओ कार्यालयावर धडकणार असुन या यात्रेत जिल्हाभरातुन ५० हजार पेक्षा अधिक महिलांची उपस्थिती राहणार असल्याने सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. हा आत्मक्लेश पायी मोर्चा ऐतिहासिक होणार असल्याचे जिल्हाभरात बोलल्या जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button