बुलढाणामहाराष्ट्र

पंच बंगला तेल्हारा येथे सक्रिय युवा कार्यकर्त्यांच्या वतीने श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या ३९६ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी.

तेल्हारा दि.१० ; तेल्हारा शहरातील सक्रिय युवा कार्यकर्त्यांच्या वतीने मंगळवार दि.०९ जानेवारी २०२४ रोजी श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या ३९६ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले

   श्री संताजी महाराज चौक ,तेल्हारा येथील नियोजित सुप्रसिद्ध तेली समाजाच्या पंच बंगला नामक वास्तु मध्ये  सर्वप्रथम सागर भाऊ चहाजगुणे अध्यक्ष तेल्हारा तेली समाज  यांच्या मार्गदर्शनात सामुदायिक दीप प्रज्वलन करून श्री संत संताजी महाराज जगनाडे यांचा प्रतिमेला हार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले तसेच समाजाच्या विकासा करिता स्व. रामभाऊ सोनटक्के यांनी स्व मालकिची शेतजमिन दान केली  अशा थोर महामानवाच्या  प्रतिमेलाही या ठिकाणी हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
 अभिवादनाच्या कार्यक्रमानंतर युवा कार्यकर्त्यांनी आपल्या समाजाच्या विकासाबाबतीत अध्यक्षां सोबत चर्चा केली यामध्ये प्रामुख्याने समाजाने नवीन घेतलेली आकोटकार यांच्या बेकरी जवळील  जागेचे थांबलेले विकास कार्यसंदर्भात,पंच बंगल्याच्या वास्तु संदर्भात ,येणारा संताजी महाराजांचा जयंती उत्सव हा बहुसंख्येने व उत्साहाने साजरा करणे संदर्भात तसेच तेली समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम घेणे इत्यादी विषयासंदर्भात चर्चा करण्यात आली .अध्यक्षांनीही सकारात्मक प्रतिसाद देत वरील सर्व विषय महत्त्वाचे आहेत असे सांगून सक्रिय सहभाग घेऊन हे विषय ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात व मदतीने पुढील काळात सर्वांच्या सक्रिय सहभागाने सर्व विषय मार्गी लावू असे आश्वासन देऊन चर्चेला योग्य विराम देण्यात आला . यावेळी शिवम फाटे ,प्रफुल लभाने ,सागर चहाजगुणे,  निलेश धनभर,  यश फाटे ,राहुल फाटे ,विजय मनोहरराव घोडे ,बजरंग वारकरी ,राहुल सोनटक्के ,श्रेयस सोनटक्के ,राजू गावत्रे ,आकाश जसनपुरे,  प्रवीण अंबादासजी नायसे, प्रशांत रोठे ,विशाल पांडव  ,आदर्श भुजबले ,अनिकेत ढवळे , रोहित खोपले ,आशिष धनभरसह आदींची या ठिकाणी आवर्जून उपस्थिती होती ✍️.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button