गुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्र

बनावट अभिलेखाद्वारे फेरफार रद्द करून ठगवणूक व मंडळ अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव । शेत जमिनीच्या फेरफारसाठी तात्पुस्ता मनाई हुकूमचा आदेश असताना मंडळ अधिकारी, दोन तलाठी आणि आणखी एकाने बनावट अभिलेख तयार केला, फेरफारच्या नमुना ९ आणि नोटीसवर खोट्या स्वाक्षरी केल्याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीसांनी संबंधितांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारीनुसार, रोकडीया नगर शेगाव येथील राम भीमराव पांडे (६७) यांनी गायगाव बु येथे गट नं.८ ब क्षेत्रफळ ३ हेक्टर २४ आर १०.२८ पैकी हिस्सा सालीम ही सदाशिव नारायण वरघट (रा. सुटाळपुरा खामगाव) यांचेकडून रजिस्टर दस्ताने २२ फेब्रुवारी २००५ नुसार विकत घेतली. त्यानंतर तक्रारदार यांनी विकत घेतलेल्या शेत जमिनीचा फेरफार घेण्यासाठी तत्कालीन तलाठ्यांकडे अर्ज दिला. त्यावेळी त्यांनी जिगाव प्रकल्पामुळे परवानगीची असल्याचे सांगून फेरफार घेतला नाही. दरम्यान प्रकल्प कार्यालयाच्या परवानगीची गरज नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर तक्रारदाराला फेरफार क्रमांक ७८१ प्रमाणे नियमानुसार फेरफार देण्यात आला.

दरम्यान तत्कालीन मंडळ अधिकारी यांनी २१ ऑगस्ट २००७ रोजी घेण्यात आलेला फेरफार गैरकायदेशीरपणे रद्द केला. याबाबत कोणतीही सुचना तक्रारदार पांडे यांना देण्यात नसल्याने पांडे यांनी पुन्हा ०६ सप्टेंबर २०११ रोजी तलाठी सुनील ठोंबरे यांच्याकडे फेरफार होण्यासाठी अर्ज दिला, त्यावेळी तलाठी ठोंबरे यांनी तक्रारदाराला हेतुपुरस्सरपणे कारवाईपासून अनभिज्ञ ठेवले. दरम्यान सदाशिव वरघट व त्याची दोन मुले तक्रारदाराला शेताचे ताब्यात अडथळा निर्माण करित होते. त्यामुळे तक्रारदार पांडे यांनी वरघट यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने सदाशिव वरघट व त्यांचे मुलांविरूध्द तात्पुरता मनाई हुकूमचा आदेश दिला, असे असतानाही मंडळ अधिकारी आणि इतर आरोपींनी संगतमताने नमुना ९ आणि १२ च्या नोटीसवर तक्रारदाराच्या खोट्या स्वाक्षरी करून बनावट अभिलेख अस्तित्वात आणला व त्याद्वारे फौजदारी स्वरूपाचा कट रचून फेरफार रद्द केल्याचे न्यायालयात लेखी दिले. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने तलाठी सुनील ठोंबरे, मंडळ अधिकारी के. बी. मोरे, तलाठी कैलास वरघट आणि सदाशिव नारायण वरघट (रा. सुटाळपूरा खामगाव) यांच्या विरोधात भादंवि कलम १२० (ख) १६६, १६७, १९३, ४१७, ४१९, ४६५, ४६६, ४६८, ४७१, सहकलम ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोउपनि शिंदे करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button