राजकीयविदर्भसामाजिक

राष्ट्रवादी पक्षाच्या नंदाताई पाऊलझगडे नियोजन समितीवर नियुक्त

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव । राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या (अजितदादा पवार गट) सौ नंदाताई पाऊलझगडे यांची बुलढाणा जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे कणखर व निष्ठावान नेते तथा बुलढाणा नगरीचे माजी नगराध्यक्ष तुकाराम अंभोरे पाटील, जामठी ता. बुलढाणा येथील मनोज ज्ञानदेव दांडगे, देऊळगाव राजा येथील अर्पित जगदीश मिनासे यांची नावेही जिल्हा नियोजन समितीमध्ये समाविष्ठ आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाकडून शासनाच्या निर्णयाचे नियुक्तीसंदर्भातील तसे पत्र उपसचिव नि.भा. खेडकर यांनी २६ डिसेंबर रोजी निर्गमित केले आहे. जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, बुलढाणा यांनी उपरोक्त आदेश सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणावेत असे आदेशपत्रात नमूद असून संबंधितांची नावे पुढील आदेश होईपर्यंत किंवा शासनाकडून रद्द होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत अबाधित राहतील.

जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल सौ नंदाताई पाऊलझगडे यांच्यावर राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button