पिंपळगाव राजा येथे महा-ई-सेवा केंद्राचे उद्घाटन संपन्न दिव्यांगांना दिव्यांगांची व्यवसायितेकडे वाटचाल

स्टार भारत लाईव्ह जिल्हा प्रतिनिधी गोपाल यंगड
स्थानिक पिंपळगाव राजा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आज येथील दिव्यांग मोहम्मद रईस यांच्या महा-ई-सेवा केंद्राचे उद्घाटन थाटात संपन्न झाले गावकऱ्यांना शासनाच्या विविध अंगी योजना सेवा तसेच सुविधा करिता खामगाव शहर जावे लागत होते त्यामुळे ग्रामस्थांची ही परवड थांबवण्याकरिता व गावकऱ्यांच्या सेवेकरिता आज मोहम्मद रहीस यांच्या महा-ई-सेवा केंद्राचे उद्घाटन दिव्यांग बांधवाचे नेते मनोज नगर नाईक तसेच पिंपळगाव राजा येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच समाजसेवक जुल्कर शेख चांद व भाईजान लीडर माजी सरपंच मोहम्मद रफीक आताऊल्ला खान सिद्दिकी भाई मोहम्मद हारून यांच्या हस्ते व गावकऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला गेल्या अनेक वर्षापासून पिंपळगाव राजा येथील दिव्यांग बांधव शासनाकडून मिळणाऱ्या तसेच सेवा आपल्या पदरात टाकून घेण्यासाठी लढा देत होते आज जिल्हा प्रशासनाने येथील दिव्यांग बांधवांना महा-ई-सेवा केंद्र दिल्याने गावकऱ्यांना होणारा त्रास कमी होणार आहे तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले व सर्वात मोठे असलेले गाव पिंपळगाव राजा येथे काही वर्षापासून एकच ई महा सेवा केंद्र असल्याने ग्रामस्थांच्या विविध कामांना वेळ लागत होता आता दुसरे महा-ई-सेवा केंद्राला मान्यता मिळाल्याने ग्रामस्थांची कामे वेळेवर होणार आहेत त्याचबरोबर दिव्यांग बांधवांना व्यवसायात मदत होणार आहे एकंदरीतच सर्वसाधारण कुटुंबातील असल्याने त्यांना ग्रामस्थांच्या अडीअडचणी माहित आहे ते विविध प्रकारच्या कामासाठी सर्वप्रथम सर्वसामान्य कुटुंबांना प्राधान्य देणार असल्याची माहिती त्यांनी बोलताना दिली.
याप्रसंगी झुलकर नाईन यांनी पिंपळगाव राजा येथील दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध अंगी योजना मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मदत मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी कार्यक्रमात दिली यावेळी दिव्यांग नेते मनोज नगर नाईक यांनी गावातील दिव्यांगांची विविध विषयावर चर्चा केली
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 91 12 31 15 19



