तेल्हारा अकोट तालुक्यातील पानपिंपरी सह विविध पिकांना बसला अवकाळी पावसाचा फटका !

शिवसेना संपर्कप्रमुख मा आमदार गोपिकीशन बाजोरिया शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विन नवले शेतकऱ्यांचा बांधावर
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तालुका प्रतिनिधी
दि.१५: तेल्हारा अकोट तालुक्यात पानपिंपरी या बहुगुणी औषधी पिकाचे उत्पादन दरवर्षी घेतल्या जाते. परंतु, नोव्हेबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने या तोडणीला आलेल्या पिकाला फटका बसला असून पानपिंपरी कांदा हरभरा फळबाग सह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. लाखो रुपये खर्चुन पानपिंपरीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
तेल्हारा-अकोट तालुक्यात काही भागात माल पावसाने भिजून ओलसर राहिल्याने बुरशी चढली तर कुठे गळून पडलेली पानपिंपरी कोरड्या जागेत वळविण्याचा केविलवाणा प्रयत्न पानपिंपरी उत्पादक शेतकऱ्यांकडून केला जात आहे. तेल्हारा व अकोट तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात औषधी गुण असलेल्या पानपिंपरीचे उत्पादन घेतले जाते. पानपिंपरीचे उत्पादन प्रामुख्याने पानांच्या तांड्यात घेतले जाते. या व्यवसायात प्रामुख्याने बारी समाज मोठ्या संख्येने असून अत्यंत खर्चीक महागड्या असणाऱ्या या पिकावर या वर्षीही शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केला आहे. परंतु गेल्या आठवड्यात ऐन तोडणीच्या हंगामात आलेल्या या वेलवर्गीय पिकाला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसल्याने
पानपिंपरी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
वर्षातून एकदाच म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेतल्या जाणाऱ्या या पिकाला सततच्या पावसाने वेलीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे बुरशीसह काळ्याचे पांढरे झाले असून, मालाचा दर्जा खालावला असुन पावसामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची लवकरात लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी याकरिता शेतकऱ्यांनी शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख मा आमदार गोपीकीशन बाजोरीया जिल्हा प्रमुख अश्विन नवले यांच्या कडे मागणी केली आहे.
शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख मा आमदार गोपीकीशन बाजोरीया जिल्हा प्रमुख अश्विन नवले यांच्या सह शिवसेना पदाधिकारी यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पानपिंपरी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे दुःख ऐकून घेतले व इतरही अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. महाराष्ट्राचे.मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे शेतकऱ्यांनी काळजी करु नये त्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.यावेळी प्रामुख्याने उपस्थिती
तेल्हारा तहसीलदार डॉ संतोष येवलीकर तेल्हारा कृषीविभागाचे नागे साहेब यांनी तेल्हारा अवकाळी पावसामुळे तालुक्यातील पिकांचे झालेल्या नुकसानी बाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख मा आमदार गोपीकीशन बाजोरीया ,जिल्हा प्रमुख अश्विन नवले ,महिला आघाडी चे जिल्हा संघटक उशाताई विरक ,तेल्हारा विभागाचे महानगर प्रमुख योगेश अग्रवाल ,उप जिल्हाप्रमुख शशिकांत चोपडे ,तेल्हारा तालुका प्रमुख प्रवीण वैष्णव ,शहर प्रमुख अनिकेत ढवळे ,उप तालुकाप्रमुख प्रमोद निळे ,भास्कर कोरडे ,प्रकाश चिकटे ,संदीप बोडखे ,शिवा सोनटक्के ,हिंगणी सरपंच गजानन वाघ ,जेष्ठ शिवसैनिक वासुदेवराव निंबोकार ,गजानन दाभाडे ,प्रकाश वानखडे ,रणवीर काकड ,संगिता शुक्ल ,प्रिती सासोटे ,चंद्रकांत इंगळे ,सचिन इंगळे ,राहुल निळे ,काशिनाथ काळे ,संदीप सागर दाभाडे ,राजेश निंबोकार यांच्या सह तेल्हारा तालुक्यातील शेतकरी विलास ताळे ,विजय नाठे ,प्रमोद राऊत ,गणेश रेखाते ,अतुल नाठे ,दिनेश रेखाते ,किशोर नाठे ,मंगेश नाठे ,देवाभाऊ नाठे ,दिपक हागे ,महादेव रेखाते ,योगेश दामधर ,संतोष दातीर ,शिवहरी दामधर ,काशिनाथ अस्वार यांच्या सह तेल्हारा तालुक्यातील शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते✍️.



