महाराष्ट्र

भारतीय सैन्य दलातुन जवान निलेश भास्करराव डोंगरे यांचे सेवानिवृत्ती नंतर प्रथम दहिगाव अवताडे येथे आगमन होताच गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढून केला सत्कार.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

दहिगाव अवताडे ; भारतीय सैन्य दलातुन जवान निलेश भास्करराव डोंगरे यांना दि ३० नोव्हेंबर २०२३ रोजी सेवानिवृत्ती मिळाली असून त्यांचे दहिगाव अवताडे येथे निवृत्तीनंतर प्रथम आगमन होताच गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढून प्रत्येक गल्लीत त्यांचा गौरव करण्यात आला तर काही ठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

  तेल्हारा तालुक्यातील दहिगाव अवताडे येथील रहिवासी निलेश भास्करराव डोंगरे हे २०२३ या वर्षात भारतीय सैन्य दलात रुजू झाले, देशातील विविध भागात त्यांनी सेवा दिली असून जम्मू काश्मीर सारख्या अतीशय संवेदनशील भागातही त्यांची सेवा झालेली आहे. त्यांची भारतीय सैन्य दलात २० वर्ष ०५ महिने इतकी सेवा झाल्यानंतर दि.३० नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांना त्यांच्या कर्मभूमीतून सेवानिवृत्ती मिळाली. 
  तेल्हारा तालुक्यातील दहिगाव अवताडे येथे त्यांचा रहिवास आहे. निलेश डोंगरे यांचे दहिगाव अवताडे येथे दि.०१ डिसेंबर २०२३ रोजी निवृत्तीनंतर प्रथम आगमन झाले त्यांचे गावात आगमन होताच गावकऱ्यांनी भव्य दिव्य अशी गावातून मिरवणूक काढून उल्लेखनीय सत्कार केला यादरम्यान विविध ठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली तसेच गावातील लहान मुलं-मुली ,बुजुर्ग महिला व पुरुषांकडून त्यांचे पूजन करण्यात आले .
   दहिगाव अवताडे येथील प्रसिद्ध हनुमान मंदिर येथे गावकऱ्यांच्या वतीने सेवानिवृत्ती निमित्त कार्यक्रमाचे अतिशय उत्साहाने आयोजन केले होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पणाने केली या  कार्यक्रमाचे अध्यक्ष तेल्हारा तालुका आजी माजी सैनिक संघटनेचे तालुका उपाध्यक्ष बाळकृष्ण बोदडे असून, यावेळी आजी माजी सैनिक संघटनेचे  वसंत रोठे ,पांडुरंग खूमकर ,रामदास लासुरकर ,प्रकाश खंडागळे ,श्रीकांत ताथोड ,प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तेल्हारा पोलीस स्टेशन उपनिरीक्षक कायंदे साहेब, विश्वनाथ डांगे, दहिगांव  ग्रामपंचायत चे सरपंच रविकिरण काकड ,पोलीस पाटील अरविंद अवताडे हे होते कार्यक्रमाला गावातील आजी-माजी सैनिक संघटनेचे सेना मेडलिस्ट मा.सुधाकर सुरळकर ,महादेव महाले ,रामदास महाले ,सी.आर पी.एफ जवान राजेश सोळंके ,भारतीय सैन्य दलाचे अजय निमकर्डे, तिवर टेलर वंचित बहुजन आघाडीचे लखन सोनटक्के ,वाकोडे बंधू ,वर्गे सर हे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग खूमकर यांनी केले, निलेश डोंगरे यांचा मुख्य सत्कार पोलीस स्टेशन तेल्हाराचे उपनिरीक्षक कायंदे साहेब यांच्या हातून करण्यात आला श्री कायंदे यांनी आपल्या भाषणात सैनिकाच्या त्यागाबद्दल तसेच त्यांचे कार्य व त्या कार्यामुळे होत असलेले फायदे याबद्दल माहिती विशद केली असून तेल्हारा तालुका आजी माजी सैनिक संघटना व उपस्थित मान्यवरांच्या वतीने सुद्धा निलेश डोंगरे यांचा अभिमानाने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन अक्षय अवताडे यांनी केले. आपल्या अपत्याला देशाच्या सेवेकरीता विशाल हृदयाने पाठविल्याबद्दल सर्वप्रथम आई-वडिलांचे व उपस्थित मान्यवरांचे इंजिनीयर रवी आढाऊ यांनी आभार मानले रवी आढाव यांच्या आभार प्रदर्शनाने आई-वडिलांचे अश्रू अनावर झाले या बाबीची सर्वत्र प्रशंसा होत आहे. गावकऱ्यांच्या वतीने या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांकरीता उत्तम जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने व भारत मातेच्या जयघोषाने करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button