महाराष्ट्रविदर्भ
आ. अँड. फुंडकरांच्या उपस्थितीत जनुना चौफुलीवर बनविले गतिरोधकजी. डी.रोकडे बुलडाणा प्रतिनिधीखामगाव ::- अतिशय धोकादायक अपघातस्थळ असलेल्या जनूना चौफुलीवर आ अँड आकाश फुंडकर यांनी स्वतः उपस्थित राहून गतिरोधक बनवून घेतले.

राष्ट्रीय महामार्गावरील जनुना चौफुलीवर मोठ्या प्रमाणात अपघात होतात. आतापर्यंत झालेल्या अपघातात अनेकांना जीव गमवावे लागले तसेच अनेक जखमींना कायम अपंगत्व प्राप्त झाले. त्यामुळे या अतिशय धोकादायक अपघात स्थळी कायमस्वरूपी गतिरोधक बनवावे अशी मागणी होत होती. आ अँड आकाश फुंडकर यांनी याची दखल घेतली व सदर ठिकाणी गतिरोधक बनवावे असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. दरम्यान आज 26 नोव्हेंबर रोजी आ अँड आकाश फुंडकर हे स्वतः जनुना चौफुलीवर उपस्थित राहिले व सर्वांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गतिरोधक बनवून घेतले. भविष्यात या ठिकाणी अपघात होऊ नये याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री काळे यांना दिले……..



