खानदेशजळगावा जिल्हा

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिलाहिंसाचार निर्मूलन दिवसानिमित्‍त मार्गदर्शन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

जळगाव – दरवर्षी २५ नोव्हेंबर हा दिवस महिलांवरील निर्मूलनानिमित्‍त विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. या दिवसानिमित्‍त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातही शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी युनिटी इनव्हेस्ट टू प्रिव्हेंट व्हायलन्स अगेंस्ट वुमन अ‍ॅण्ड गर्ल्स ह्या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते.
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील ऑब्स्ट्रेट्रिक्स अ‍ॅण्ड गायनॅकलॉजी विभागातर्फे आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमास सेमिनार हॉल येथे सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.नयना महाजन-झोपे यांना आमंत्रित केले होते. त्यांनी महिलावर होणारे हिंसाचार, त्यातून महिलांनी कसा प्रतिकार करावा, त्यासाठी कायद्याची मदत कशी घेता येवू शकते याबाबत सविस्तर माहिती दिली. कुटूंबात राहत असतांना एका महिलेवर हिंसाचार होत असतांना दुसर्‍या महिलेने तो कसा रोखावा हे देखील सांगितले. हिंसाचार रोखण्यासाठी एकजुट महत्वाची असते, यामुळे महिलांनी एकमेकींची निंदा न करता सहकार्य भावना ठेवावी, असे आवाहन डॉ.झोपे यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्या प्रा.विशाखा गणवीर, प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी प्रा.मिनाऊ, प्रा.निम्मी वर्गीस, प्रा.जयश्री जाधव, प्रा.श्वेता डहाके, प्रा.प्रिया मसुरे यांच्यासह एमएस्सीचे विद्यार्थी सावित्री सिंग, सुवर्णा पटील, प्राजक्‍ता सावरकर, कॉलेट लोंढे, रासेयो स्वयंसवेक व बीएस्सी प्रथम व जीएनएम प्रथम वर्षातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button