अपघातखानदेशजळगावा जिल्हा

घरात दिवाळीची साफसफाई करताना प्रौढासोबत अघटित घडलं, जळगावातील घटना

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस।

प्रतिनिधी रणधीर पवार
। घरात दिवाळीची साफसफाई करत असताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्याने प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील नित्यानंद सोसायटी परिसरात घडली. उल्हासराव चंद्रराव पाटील (वय-५२) असं मृत प्रौढाचे नाव असून याबाबत रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील नित्यानंतर सोसायटीच्या उल्हासराव पाटील हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह तिसऱ्या मजल्यावर वास्तव्याला असून ते ममुराबाद येथील जिल्हा मृदा सर्व्हेक्षण व मृदा चाचणी विभागात कृषी पर्यवेक्षक म्हणून नोकरीला होते.

दरम्यान, सध्या दिवाळी असल्याने गुरूवारी सकाळी साडे घराच्या बाल्कनीमध्ये साफसाफाईचे काम करत होते. साफसाफाई करतांना त्यांचा पाय घसरून तोल गेल्याने ते तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले. त्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल सुनिल पाटील करीत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिवाळीचे घरी दिवे लागणार त्यापूर्वी हे अघटित घडलं, ज्या घरी दिवाळीचे दिवे लागणार होते, त्याच घरात आता शोककळा पसरली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button