गुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्र

बचत गटाच्या लोन संदर्भात व्हिजिट कामी गेलेला बँक मॅनेजरला मारहाण; गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहुरकर

शेगाव |बँकेच्या मॅनेजरला मारहाण झाल्याच्या घटनेची तक्रार खुद्द मॅनेजरने शहर पो.स्टे. ला दिली असून पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी बँक मॅनेजर नंदकिशोर रविंद्र महाजन वय २४ वर्षे रा. शनीपेठ जळगाव खान्देश ह.मु. घाटपुरी नाका खामगाव यांनी शहर पो.स्टे. ला दिलेल्या तक्रारीनुसार १० नोव्हेंबर रोजी फिर्यादी स्वतः शेगाव शहरातील इदगाह प्लॉट येथे बचत गटाचे लोन संदर्भात व्हिजीट कामी गेले असता गैरअर्जदार यांनी तु येथे का आला असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ करून

मारण्याच्या धमक्या दिल्या व चापटा बुक्क्यांनी मारहाण करून खाली पाडले. अशा तोंडी रिपोर्टवरून पोलिसांनी सै. सिद्दीक सै. सादीक, शे. मसुद शे. चाँद, दोन अनोळखी तरूण यांच्या विरूध्द कलम ३२३, ५०४, ५०६ भादंविनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास नापोका निलेश गाडगे हे करित आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button