खानदेशजळगावा जिल्हा

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातधन्वंतरी पूजन उत्साहात

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

रणधीर पवार

जळगाव : दिपोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी धनत्रयोदशीनिमित्‍त डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आज धन्वंतरी देवतेचे पूजन गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी धन्वंतरीच्या प्रतिमेस मार्ल्यापण करुन सर्वांना सुखी ठेव, आनंदात ठेव, निरोगी आरोग्य प्रदान कर, अशी प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयातील लेखापाल, क्‍लर्क आदि उपस्थीत होते.

डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालय
व रुग्णालयात धन्वंतरी पूजन उत्साहात
जळगाव : डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालय व रुग्णालयात दिपोत्सवाला प्रारंभ झाला असून शुक्रवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीनिमित्‍त धन्वंतरी पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, प्रशासन अधिकारी राहूल गिरी यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थीत होते. यावेळी ओपीडीतील उपयुक्‍त वस्तुचे पुजन डॉ.उल्हास पाटील यांचे हस्ते करण्यात आले. आगामी काळात जास्तीत जास्त अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्याची घोषणा यावेळी डॉ.उल्हास पाटील यांनी केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button