तेल्हारा न.प. हद्दीत निकृष्ट दर्जाचे गटार बांधकाम!

शासकीय नियमांचा भंग !
गुणवत्ता पूर्ण गटारीचे बाधकाम करण्यात यावे.अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा ; श्याम माहोरे. म.न.से. तेल्हारा शहर अध्यक्ष.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा ता.प्रतिनिधी विजय घोडे
तेल्हारा दि ८ ;
तेल्हारा नगर परिषदे मार्फत सुरु असलेले अग्रसेन टावर चौक ते संत तुकाराम महाराज चौक पर्यंत
रस्ताचे दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे
शासनाच्या १.६८ कोटी रुपायचे अनुदानातून हे काम होत असुन, या निविदे अंतर्गत असलेले मोठी गटार बाधकाम करण्यात येत आहे. या कामात निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आला आहे. तसेच कॉक्रीट चे मीश्रण शासकीय नियमा नुसार अत्यंत निकृष्ट आहे. काम झाल्या वर पाणी मारण्यात आलेले नाही याचाच परिणाम म्हणुन गटार पूर्ण होण्या आधीच गटारीच्या काँक्रीट ला तडे गेले आहेत तसेच या नगर परिषदेत इंजीनियर नाही, या कामावर देखरेख करण्यास नगर परिषदेचा कोणीही माणुस नाही, या सर्व प्रकारा मुळे शासनाचा कोट्यावधी रुपयाचा निधी पाण्यात जात असल्याचे दिसत आहे.
या कामाची संपूर्ण चौकशी मुख्याधिकारी यांच्या कडुन न करता PWD चे वरिष्ठ अधिकाऱ्या मार्फत करण्यात यावी तो पर्यंत या कामाचे कोणतेही बिल देण्यात येऊ नये व निकृष्ट दर्जाचे बाधकाम झालेली ही गटार तोडण्यात येऊन शासकीय नियमानुसार गुणवत्ता पूर्ण गटारीचे बाधकाम करण्यात येऊन शासनाचे अनुदानाचा योग्य फायदा नागरिकांना घेता यावा अन्यथा पक्षा तर्फे तीव्र आदोलन छेडण्याचा पवित्रा घ्यावा लागेल असा ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तेल्हारा शहर अध्यक्ष श्याम गणेश माहोरे यांनी दिला आहे तसेच याची सर्व जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची राहील असे तेल्हारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिष गावंडे यांना दि .०८ नोव्हेंबर २०२३ ला दिलेल्या निवेदनात नमूद आहे.



