बुलढाणामहाराष्ट्र

तब्बल १० तास चालला जिल्ह्याच्या विकासाचा गजर! वन बुलढाणा मशीनच्या परिवर्तन पदयात्रेला उदंड प्रतिसाद!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

“ऑक्टोबर हिट”चे घाम काढणारे ऊन असताना सुद्धा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी काढलेली बुलढाणा परिवर्तन पदयात्रा “हिट” ठरली. बुलढाणा ची जगदंबा माता ते चिखलीचे रेणुका माता मंदिर असा २५ किलोमीटरचा पायी प्रवास ४ ते५ तासांत पूर्ण होणे अपेक्षित
असताना जागोजागी होणारे पदयात्रेचे स्वागत, फटाक्याची आतिषबाजी, पुष्पवृत्ती आणि संदीप शेळके यांना भेटण्यासाठी झालेली आबाल वृद्धांची गर्दी यामुळे तब्बल १० तास ही पदयात्रा चालली. मात्र एवढे होऊनही बुलढाण्यातून ज्या उत्साहात पदयात्रा सुरू झाली तो उत्साह तसुभरी कमी न होता उलट उलट वाढत गेला.. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना संदीप शेळके यांनी जिल्ह्याच्या मागासलेपणाचे सिमोलंगण करण्यासाठी काढलेले आहे या पदयात्रेची
जिल्हाभरात चर्चा होती. विशेषत: राजकीय वर्तुळाचे देखील या यात्रेकडे लक्ष लागून होते..”आपल्या जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक, भौगोलिक दृष्ट्या गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. आपल्या जिल्ह्यात सगळं काही आहे, मात्र तरीही राज्याच्या पलटावर बुलढाणा जिल्ह्याची ओळख मागासलेला जिल्हा म्हणून होते. यावेळी मनाला खंत वाटते. आतापर्यंत लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याच्या विकासाच्या केवळ भूलथापा मारल्या असा थेट आरोप करीत आता आपल्याला जिल्ह्याचे मागासले पण दूर करायचे आहे, त्याकरिता वन बुलढाणा मिशन ही राजकीय चळवळ आहे. या परिवर्तनाच्या चळवळीत जिल्हावासीयांनी सहभागी व्हावे.”असे आवाहन यावेळी संदीप शेळके यांनी केले..
सकाळी ७ वाजता जगदंबा मातेची आरती करून यात्रेचे चिखलीच्या दिशेने प्रस्थान झाले. संदीप शेळके यांच्या अर्धांगिनी तथा राजश्री शाहू मल्टीस्टेटच्या अध्यक्षा मालती ताई शेळके यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिक पदयात्रे सहभागी झाले. रस्त्याने जागोजागी पदयात्रेची स्वागत करण्यात येत होते. माता- भगिनी संदीप शेळके यांचे औक्षण करीत होत्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या पदयात्रेदरम्यान संदीप शेळके यांची भेट घेऊन पदयात्रेला पाठिंबा दिला..
या पदयात्रे जिल्ह्याच्या कृषी तसेच अध्यात्मिक परंपरेचे दर्शन घडविण्यात आले. जिल्ह्यातील विविध गावांतील भजनी मंडळी या परिवर्तनाच्या सहभागी झाली होती. जिल्ह्यात प्रामुख्याने येणारी सोयाबीन, तुर ,कापूस, ऊस या पिकांसह दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बैलगाड्या देखील या यात्रे सहभागी झाल्या होत्या. जिल्ह्याच्या कृषी संस्कृतीचे दर्शन या माध्यमातून घडले..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button